Home /News /entertainment /

Miss Universe18 व्या वर्षी दिसायची अशी; पाहा सुष्मिता सेनचा 27 वर्षांपूर्वीचा फोटो

Miss Universe18 व्या वर्षी दिसायची अशी; पाहा सुष्मिता सेनचा 27 वर्षांपूर्वीचा फोटो

18 वर्षाच्या(18 Year) सुष्मिताने भारताला पहिल्यांदा ‘मिस युनिवर्स’ (Miss Uuniverse) चा किताब मिळवून दिला होता. 21 मे 1994 मध्ये सुष्मिताने ही स्पर्धा जिंकली हो.

  मुंबई, 22 मे: आयुष्यात अशी एखादी गोष्ट घडते, की त्यामुळे संपूर्ण आयुष्यचं बदलून जातं. असचं काहीसं झालं होतं अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत(Sushmita Sen). 18 वर्षाच्या(18 Year) सुष्मिताने भारताला पहिल्यांदा ‘मिस युनिवर्स’ (Miss Uuniverse) चा किताब मिळवून दिला होता. 21 मे 1994 मध्ये सुष्मिताने ही स्पर्धा जिंकली हो. या गोष्टीला आत्ता तब्बल 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या आठवणी आजही डोळ्यासमोर तशाचं आहेत. सुष्मिताने आपल्या इन्स्टाग्रामवर 27 वर्षांपूर्वीचा आपला फोटो शेयर (Instagram Post) करत या आठवणींना उजाळा दिला आहे.
  सुष्मिता सेनने ज्यावेळी मिस युनिवर्सचा ताज डोक्यावर चढवला होता. त्यावेळी तिनं म्हटलं होतं, हा ताज चढवताना मला जाणवलं होतं, की हा क्षण खुपचं मौल्यवान आहे. कारण हा फक्त माझा विजय नाही तर माझ्या भारताचा विजय आहे.  या गोष्टीला 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सुष्मिताने आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केली आहे.
  आपला जुना फोटो शेयर करत सुष्मितानं लिहिलं आहे, ‘तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी एखादी अशक्य अशा गोष्टीची निवड केली आहे का? आणि ती पूर्ण केल्याबद्दल देवाचं आभार मानलं आहे का? मी केलं आहे. माझ्या भारताला पहिल्यांदा मिस युनिवर्सचा किताब मिळून 27 वर्षे झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन’. अशी सुंदर पोस्ट सुष्मिताने लिहिली आहे. (हे वाचा: 2 महिन्याच्या बाळाला हवंय आईचं दूध'; भूमी पेडणेकरचं भावनिक आवाहन ) तसेच सुष्मिताने म्हटलं आहे, ‘यावेळी फक्त एका 18 वर्षाच्या मुलीचंच आयुष्य बदललं नाही. तर एक इतिहाससुद्धा रचला गेला होता. 27 वर्षांपूर्वी ही स्पर्धा फिलिपाईन्स मध्ये पार पडली होती. सुष्मिताने आपल्या पोस्टमध्ये फिलिपाईन्स आणि स्पर्धक करोलीना गोम्सचा उल्लेख करत आभार व्यक्त केल आहे. या विजयानंतर सुष्मिताला बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले होते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actress, India

  पुढील बातम्या