मुंबई 25 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा या स्वभावामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा सुरु आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी तिच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणी कंगनाला अटक होणार अशी शक्यता देखील निर्माण झाली होती. परंतु अखेर या प्रकरणी तिला जामीन मिळाला आहे. (Defamation case) प्रकरण काय आहे? कंगनानं सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यावर टीका केली होती. या लोकांमुळं सुशांतचा मृत्यू झाला असा खळबळजनक आरोप तिनं केला होता. या वक्तव्यामुळं संतापलेल्या जावेद अख्तर यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. अवश्य पाहा - चित्रपटातील किस इमरान हाश्मीला पडली भारी; संतापलेल्या बायकोनं केलं रक्तबंबाळ
Mumbai: Andheri Magistrate court grants bail to Kangana Ranaut in Javed Akhtar defamation matter.
— ANI (@ANI) March 25, 2021
She had appeared before court today and had sought cancellation of the bailable warrant issued against her. She had also applied for bail which was allowed by the court
(File pic) pic.twitter.com/KwW2FsTNzl
अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे बदनामी झाल्याची तक्रार केली होती. कंगनावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे अख्तर यांच्या तक्रारीवर अहवाल सादर करताना पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर न्यायालयानं कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ती हजर न झाल्यानं न्यायालयानं तिच्याविरोधात अटक वॉरंट बजावलं होतं. मात्र कंगनानं अटक टाळण्यासाठी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. दरम्यान या प्रकरणी सत्र न्यायालयाकडून कंगनाला जामीन मिळाला आहे.