टायगर श्रॉफसोबत पहिल्या ऑनस्क्रीन किसच्या प्रश्नावर अनन्या पांडेनं दिलं 'हे' उत्तर

टायगर श्रॉफसोबत पहिल्या ऑनस्क्रीन किसच्या प्रश्नावर अनन्या पांडेनं दिलं 'हे' उत्तर

'स्टूडंट ऑफ द इयर 2'मधील गाणं 'मुंबई दिल्ली दी कुड़ियां'मध्ये टायगरनं तारा सुतारिया आणि अनन्या पांडे दोघींसोबतही लिप लॉक किसिंग सीन दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक बिग बजेट सिनेमांच्या चर्चा आहेत. यापैकीच एक आहे टायगर श्रॉफ अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांचा 'स्टूडंट ऑफ द इयर 2' सध्या हे तिन्ही स्टार त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. पण या सिनेमातील टायगर श्रॉफ आमि अनन्या पांडे यांच्या लिप लॉक किसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या सीनबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनन्या मनमोकळेपणानं बोलली. अनन्याला यावेळी टायगर सोबत दिलेल्या पहिल्या वहिल्या ऑनस्क्रीन किसिंग सीनचा अनुभव विचारण्यात आला आणि त्यावर अनन्यानं दिलेलं उत्तर ऐकून स्वतः टायगर सुद्धा आश्चर्यचकित झाला.

'स्टूडंट ऑफ द इयर 2'च्या प्रमोशनसाठी अनन्या, टायगर आणि तारा यांनी नुकतीच एका रेडिओ शोमध्ये हजेरी लावली, त्यावेळी अनन्याला या सिनेमात टायगर सोबत दिलेल्या किसिंग सीनचा अनुभव विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अनन्या म्हणाली, 'माझं हे आतापर्यंतचं पहिलं किस होतं. या आधी मी कोणालाही किस केलेलं नाही त्यामुळे मी यात तुलना करू शकत नाही . फक्त एवढं सांगू शकते की हे आतापर्यंतचं पहिलं बेस्ट किस होतं.'

 

View this post on Instagram

 

My faves from the list with a snap of #thanos... which one’s yours? #SOTY2on10thMay #SOTY2

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

कॅनडा माझं घर आहे रिटायर झाल्यावर इथेच स्थायिक होणार, अक्षय कुमारचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

अनन्याचं हे उत्तर ऐकल्यावर मात्र स्वतः टायगर श्रॉफ आश्चर्यचकित झाला. जेव्हा टायगरला तो कोणत्या गोष्टीत स्वतःला बेस्ट समजतो असा प्रश्न विचारण्यात आला, त्याला उत्तर देताना टायगर म्हणाला, 'मैं किस में बेस्ट हूं? दरअसल मुझे नहीं पता कि मैं किस में बेस्ट हूं.' यावर तारा पटकन बोलली, 'टायगरनं स्वतःच स्वतःच्या प्रश्नांमधून उत्तर दिलं आहे की तो 'किस'मध्ये बेस्ट आहे.' त्यानंतर अनन्यानंही टायगर किसिंगमध्ये बेस्ट असल्याचं म्हटलं आणि यावर टायगर श्रॉफ चक्क लाजताना दिसला. 'स्टूडंट ऑफ द इयर 2'मधील गाणं 'मुंबई दिल्ली दी कुड़ियां'मध्ये टायगरनं तारा सुतारिया आणि अनन्या पांडे दोघींसोबतही लिप लॉक किसिंग सीन दिला आहे. तारा, अनन्या आणि टायगर यांची जबरदस्त केमिस्ट्री असलेला 'स्टूडंट ऑफ द इयर 2' येत्या 10 मे ला रिलीज होणार आहे.

'माफी न मागितल्यास घरात घुसून मारू', जावेद अख्तर यांना धमकी

First published: May 4, 2019, 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading