मुंबई, 16 जुलै : अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta durgule) प्रमुख भूमिकेत असलेला ‘अनन्या’(Ananya) चित्रपट येत्या 22 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या सुरू आहे. हृता दुर्गुळे विविध ठिकाणी प्रमोशन करताना सध्या दिसत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हृता थेट पुण्याच्या टॉकरवडीकडे पोहोचली. ह्या दोघींचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळेने ‘अनन्या’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुखसोबत एक धमाल व्हिडीओ केला आहे. अभिनेत्री अमृता देशमुखने (Amruta deshmukh) नुकताच हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमृता देशमुख हृताला चक्क बहीण म्हणत आहे. आणि ती बहीण असल्याचे सगळे फायदे घेत आहे. तुम्हालाही प्रश्न पडला ना की हे प्रकरण नक्की आहे तरी काय? चला जाणून घेऊया. हे वाचा - Man Udu Udu Jhala: कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात दीपूचा इंद्राजींसाठी सुरेख उखाणा; तुम्ही ऐकालात का? खरंतर ‘अनन्या’ चित्रपटामध्ये हृता साकारत असलेल्या भूमिकेचं नाव अनन्या देशमुख असं आहे. त्यामुळे अमृता तिला स्वतःची बहीणच मनात आहे. आणि देशमुख या आडनावाखाली अनन्या च्या म्हणजेच हृताच्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत आहे. म्हणजे तिने ऑर्डर केलेलं जेवण जेवतीये, तसेच तिच्या वस्तू वापरताना दिसत आहे. त्याचबरोबर ती अनन्याचा मोबाइलसुद्धा वापरताना दिसत आहे. हे सगळं करताना ‘बहिणींमध्ये एवढं चालतं ना’ असं ती म्हणतेय.
तिचाच डाव तिच्यावर उलटवत हृताने म्हणजेच अनन्याने तिच्या मित्रालाच पळवलं आहे. असा हा देशमुख सिस्टर्सचा व्हिडीओ शेअर करताना अमृताने ‘देशमुख सिस्टर्सपैकी एक निघाली अनन्यसाधारण Prankstar’ असा मजेशीर कॅप्शन दिला आहे. या दोघींची हि केमिस्ट्री चाहत्यांना भलतीच आवडलेली दिसतीये. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत या व्हिडिओला भरघोस प्रतिसाद दिला आहे. हे वाचा - Hruta Durgule : अनन्यासाठी हृतानं घेतली प्रचंड मेहनत; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी अभिनेत्री अमृता देशमुख अभिनयानंतर आता आरजे म्हणून काम करत आहे. ती पुण्याची टॉकरवडी म्हणून सध्या सगळीकडे गाजत आहे. अमृता कायम तिचे धमाल विनोदी व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावरून शेअर करत असते. तीच इंस्टाग्रामवर प्रचंड चाहते आहेत. नवनवीन महत्वाच्या विषयावर ती व्हिडीओ बनव्तास्ट. त्या व्हिडीओजना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. तर अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या तिच्या येणाऱ्या अनन्या आणि टाईमपास ३ या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.