मुंबई 8 मार्च: आनंद शिंदे (Anand Shinde) हे मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित गायक म्हणून ओळखले जातात. आजवर 250 पेक्षा अधिक गाणी गाऊन त्यांनी आपल्या सुरेल आवाजानं रसिकांचं मनोरंजन केलं आहे. (Anand Shinde success story) परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल एक वेळ अशीही होती जेव्हा आनंद शिंदे यांच्याकडे घालण्यासाठी चांगले कपडे देखील नव्हते. त्यांचे आजी- आजोबा भिक्षा मागायचे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही आनंद शिंदे यांचा धीर खचला नाही. त्यांनी अफाट मेहनत करुन अखेर यशाचं शिखर गाठलंच. (marathi playback singer) आनंद शिंदे यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील हे कटू प्रसंग सांगितले. अवश्य पाहा - विद्या बालनचं वाढलेलं वजन ठरलं होतं राष्ट्रीय मुद्दा, अभिनेत्रीनं सांगितलं नैराश्याचं कारण… आनंद शिंदे यांचे आजोबा भगवानबाबा हे हार्मोनियम वाजवायचे. तर आजी सोनाबाई तबला वाजवायच्या. त्यांचं घराणं चोखामेळा परंपरेतील गोसावी घराणं होतं. गाणी, भजनं आणि किर्तन करून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. हार्मोनियमवर गाणी गात त्यांचे आजी-आजोबा भिक्षा मागायचे. पूर्वजांपासून चालत आलेली गाण्याची ही कला त्यांच्याकडे आली होती. आनंद शिंदे यांचं बालपण कल्याणच्या कोळशेवाडीतील सिद्धार्थ नगरमध्ये गेलं. तिथेच त्यांचं शिक्षणही झालं. शाळेत असतानाच त्यांना कोळशेवाडीतील मंडईच्या स्टेजवर गाण्याची संधी मिळाली. मनोहर लोकरे म्हणून कवी होते. त्यांचं ‘लेवून आरती सुगंधी फुला, आलो शरण गणराया तुला’ हे गाणं त्यांनी पहिल्यांदा स्टेजवर गायलं. त्यांचा हा पहिला सार्वजनिक परफॉर्मन्स होता. पण स्टेजवर जाऊन गाणं गाण्यासाठी त्यांच्याकडे चांगले कपडे नव्हते त्यामुळे शाळेच्याच ड्रेसवर स्टेजवर जाऊन त्यांनी हे गाणं गायलं होतं. असे अनुभव सांगत संकटांशी दोन हात करायला शिका, कधीही हार मानू नका आणि प्रामाणिक मेहनत करा असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला. या प्रसंगाच्या माध्यमातून त्यांनी स्वत:च्या यशाची गुरुकिल्ली सांगितली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







