जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'देवमाणूस 2' मालिकेत होणार तांबडे बाबाची एंट्री, पाहायला मिळणार नवीन ट्वीस्ट!

'देवमाणूस 2' मालिकेत होणार तांबडे बाबाची एंट्री, पाहायला मिळणार नवीन ट्वीस्ट!

'देवमाणूस 2' मालिकेत होणार तांबडे बाबाची एंट्री, पाहायला मिळणार नवीन ट्वीस्ट!

झी मराठीवरील या मालिकेत दमदार खलनायकाची एंट्री होणार आहे. मालिकेत लवकरच महाट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल- ‘देवमाणूस 2’ ( devmanus ) मालिकेत नुकतेच डिंपल आणि डॉक्टरचे लग्न झाले आहे. मालिकेत नुकतेच डिंपल आणि डॉक्टरचे लग्न झाले आहे. परंतु सोनुने त्यांच्या लग्नाला विरोध दर्शवला होता हे पाहून डॉक्टरने सोनूचा काटा काढलेला आहे. सोनू आता ह्या जगात नाही हे पाहून तिची आई आता वेडी झाली आहे. त्यांची जमीन डॉक्टरने बळकावली आहे. त्यामुळे आता काही गुंड ती जमीन आपल्या साहेबांच्या नावावर करण्यासाठी डॉक्टरला धमकावत आहेत. या गुंडांचा साहेब लवकरच मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ही भूमिका आता अभिनेते मिलिंद शिंदे ( milind shinde ) साकारणार आहेत. झी मराठीने मिलिंद शिंदेच्या न्यू एंट्रीचे जोरदार प्रमोशन केलं आहे. झी मराठीनं मिलिंद शिंदे यांचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, नैन तुम्हारे दर्पण मेरा…अब तो दर्शन दे दो बाबा…तुम्हारे शरण में तांबडे बाबा.. यावरून मालिकेत लवकरच नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत ते मार्तंड जामकरची भूमिका साकरताना दिसणार आहेत. वाचा ‘ही’ अभिनेत्री जय दुधाणेसोबत पोहोचली मालदीव्सच्या किनारी, बिकिनी फोटो viral अभिनेते मिलिंद शिंदे यांनी आजवर खलनायकी ढंगाच्या भूमिका गाजवल्या आहेत. झी मराठीवरील ‘तू तिथे मी’ या मालिकेत मिलिंद शिंदे यांनी दादा होळकर ही भूमिका साकारली होती. त्यात ते सतत तांबडे बाबांची पूजा करताना दाखवले होते. तांबडे बाबांमुळे मिलिंद शिंदे यांना एक वेगळी ओळख मिळाली याच भूमिकेमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते.

जाहिरात

नटरंग, पारध, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा चित्रपटातून त्यांनी आपल्या सजग अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं, तुझ्या इश्काचा नाद खुळा, आई माझी काळूबाई, माझ्या नवऱ्याची बायको, सरस्वती अशा मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात