जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘Raazi’ चित्रपटात काम कसं मिळालं? अमृता खानविलकरनं सांगितला त्या पाकिस्तानी भूमिकेचा किस्सा

‘Raazi’ चित्रपटात काम कसं मिळालं? अमृता खानविलकरनं सांगितला त्या पाकिस्तानी भूमिकेचा किस्सा

‘Raazi’ चित्रपटात काम कसं मिळालं? अमृता खानविलकरनं सांगितला त्या पाकिस्तानी भूमिकेचा किस्सा

केवळ स्टार किड्सला संधी देणाऱ्या करण जोहरनं मराठमोळ्या अमृता खानविलकरला आपल्या चित्रपटात महत्वाची भूमिका दिली तरी कशी?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 मे**:** अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अमृतानं मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली आहे. याचं एक उदाहरण आपल्याला राजी (Raazi) या सुपरहिट चित्रपटात पाहायला मिळतं. तिनं या चित्रपटात साकारलेली मुनिरा (munira) ही पाकिस्तानी व्यक्तिरेखा तुफान गाजली. अनेक चित्रपट समिक्षकांनी यासाठी तिची स्तुती केली. परंतु तिला ही भूमिका मिळाली तरी कशी? करण जोहर (Karan Johar) हा प्रामुख्यानं केवळ स्टार किड्सला आपल्या चित्रपटांमध्ये संधी देतो असं म्हटलं जातं. मग त्यानं अमृताला या चित्रपटात घेतलं तरी कसं? हा प्रश्न वारंवार तिला विचारला जातो. अखेर तिनं चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं. सांगितला तो भन्नाट किस्सा… महिना 3 हजारांची नोकरी करायची; नागिन बनून अदा खान झाली कोट्यवधींची मालकीण “2015 मध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तब्बल दोन वर्ष माझ्याकडे काही काम नव्हतं… 2017 मध्ये मी आणि पती हिमांशू प्रवासाहून मुंबईत परतत असताना, हिमांशूने, मी पूर्वी काम केलेल्या कास्टिंग डायरेक्टर्सना फोन करण्याचं सुचवलं आणि मी मुंबई विमानतळावरूनच जोगी सरांना फोन केला. त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी भेटायला बोलावलं. त्यांच्या ऑफिसमध्ये पोहचल्यावर त्यांनी मला एक स्क्रिप्ट दिलं, मी वाचलं. संवाद उर्दू भाषेतील होते. पण, त्यावेळीही त्यांनी विश्वासाने मला दिलासा दिला. दोनच दिवसांत मला त्यांचा पुन्हा फोन आला तो ‘धर्मा’ या निर्मिती संस्थेच्या ऑफिसमध्ये जा असं सांगण्यासाठी. तिथे मला मेघना गुलझार भेटणार होत्या. मी धर्माच्या ऑफिसमध्ये पोहचले. काहीवेळाने मेघना यांच्यासोबत माझी भेट झाली त्यांनी माझं ऑडिशन आवडल्याचं सांगितलं. पण, भूमिका पाकिस्तानी मुस्लिम व्याक्तिरेखीची असल्यामुळे मला उर्दू भाषेवर काम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. मी तयारी दाखवली आणि क्षणार्धात मला त्यांनी अभिनंदन असं म्हटलं. मला काही कळतं नव्हतं. “तुम्हाला दुसरी ऑडिशन नको?”, मी विचारलं. नाही, तुझं या चित्रपटाच्या प्रवासात स्वागत आहे म्हटलं आणि माझा ‘मुनिरा’ म्हणून प्रवास सुरु झाला. हा चित्रपट आणि यातील प्रत्येक जण माझ्यासाठी खास आहे.” इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन अमृतानं हा किस्सा सांगितला. तिचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात

राजी हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट हिनं मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. परंतु स्टार किड्स असतानाही अमृतानं मुनिरा साकारुन सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. तिनं केलेलं उर्दू संभाषण पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. या चित्रपटाला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं तिनं हा किस्सा सांगितला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात