मुंबई, 21 जानेवारी- अमृता फडणवीस सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतात. त्या बऱ्याचवेळा रोखठोक वक्तव्ये करत प्रकाशझोतात येतात. तसेच त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आपल्या 'आज मैने मूड बना लिया' या नव्या गाण्यामुळे प्रसिद्धीत आल्या आहेत. या गाण्यातील त्यांचा ग्लॅमरस लुक बराच व्हायरल झाला आहे. दरम्यान आता त्या आपल्या नव्या रीलमुळे वादात अडकताना दिसून येत आहेत. पाहूया नेमकं काय घडलंय.
अमृता फडवणीस यांनी नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एक इन्स्टाग्राम रील आहे. यामध्ये त्यांनी सोशल मीडिया स्टार रियाजसोबत आपल्या 'आज मैने मूड बनालिया' या गाण्यावर रील बनवला आहे. यामध्ये अमृता आणि रियाज डान्स स्टेप्स करताना दिसून येत आहेत. एकीकडे हा व्हिडीओ सध्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे या व्हिडीओमुळे अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसून येत आहेत.
अमृता फडणवीस यांनी शेअर केलेला व्हिडीओवर आता राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ आपले पती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी बंगल्यावर शूट केल्याचा दावा राष्ट्रीवादी काँग्रेसने केला आहे. तसेच अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ शूट करण्याधी अधिकाऱ्यांकडून कायदेशीर परवानगी घेतली होती का असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे.
View this post on Instagram
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेत हा व्हिडीओ सरकारी निवास्थानी शूट केला गेला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांचा हा व्हायरल व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हेमा पिंपळे यांनी आक्षेप घेत म्हटलं आहे, 'हा व्हिडीओ त्यांनी सरकारी निवासस्थानी शूट केला आहे. यासाठी राज्याच्या सार्वजनिक कार्य विभागाची परवानगी घेतलीय की सांस्कृतिक मंत्रालयाची असा सवाल त्यांनी केला आहे.
या सर्व प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीय. हेमा पिंपळे यांनी आणि या व्हिडीओवर आक्षेप घेतल्याने अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादात अडकल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमृता यांचं हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. हे गाणं बॅचलर पार्टीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta fadanvis, Entertainment