बीड, 4 सप्टेंबर: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. अनेक कलाकार विविध ठिकाणी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरने बीडच्या परळीमध्ये हजेरी लावली होती. बीडच्या परळीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी लावणी या लोकनृत्यावरुन अनेक टीकास्त्र सोडलेले पहायला मिळाले. टीकांचा भडीमार करणाऱ्यांना अमृतानं चांगलंच सडेतोड उत्तर दिलं. परळीच्या नाथ प्रतिष्ठान आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली. अमृता म्हणाली, ‘लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. लावणीचा वेगळा मान आहे त्याचे वेगळे स्थान आहे. लावणीला खालच्या नजरेने पाहणे पाप आहे.आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला दर्शवणारी लावणीचा आदर करायला शिका आणि लावणीला व्ह्यूज मिळवण्यासाठी ट्रोल करू नका लावणीचा आदर करा’. हेही वाचा - ‘आयुष्यातल्या कित्येक चढ-उतारात…’; अमृता सुभाषची सुबोध भावेंसाठी Emotional पोस्ट ‘लावणी ही शृंगारक असली तरी ती धार्मिक आहे असे मला वाटतं. शृंगार हा एखाद्या स्त्रीने कसा प्रस्तुत करावं याचं जागतं उदाहरण लावणी आहे. एक कलाकार म्हणून एवढीच विनंती करु इच्छिते की एवढा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम एकतर कोणी करत नाही. जर कोणी करत असेल तर त्याला गालबोट लावू नका’. असं आवाहनही अमृतानं केलं. त्यामुळे सध्या अमृताच्या या वक्तव्याची चर्चा होताना दिसतेय. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत. दरम्यान, अमृता खानविलकरने नुकत्याच आलेल्या तिच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात नृत्यांगणेची प्रमुख भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. तिच्या या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याशिवाय या पहिलेही अमृतानं ‘नटरंग’ चित्रपटात अशीच काहीशी भूमिका साकारली होती. तिची ही भूमिकादेखील गाजली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.