जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आयुष्यातल्या कित्येक चढ-उतारात...'; अमृता सुभाषची सुबोध भावेंसाठी Emotional पोस्ट

'आयुष्यातल्या कित्येक चढ-उतारात...'; अमृता सुभाषची सुबोध भावेंसाठी Emotional पोस्ट

'आयुष्यातल्या कित्येक चढ-उतारात...'; अमृता सुभाषची सुबोध भावेंसाठी Emotional पोस्ट

आपल्या अभिनयानं सगळ्यांना वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. तीनं अभिनेता सुबोध भावेसाठी खास पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 सप्टेंबर: आपल्या अभिनयानं सगळ्यांना वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अमृता सुभाषदेखील सोशल मीडियावरही बरीच सर्किय असते. ती नेहमीच नवनवीन किस्से, फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच अमृता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच अमृता सुभाषनं झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘बस बाई बस’ मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर तीनं अभिनेता सुबोध भावेसाठी खास पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरतेय. अमृता सुभाषनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं ‘बस बाई बस’ कार्यक्रमातील सुबोध भावेंसोबतची एक झलक शेअर करत त्यांच्यासाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. अमृता म्हणते की, “सुबोध भावे.. माझा जवळचा मित्र. माझा प्रत्येक प्रोजेक्ट पाहिलेला, अगदी पुरुषोत्तम करंडक पासून ते ‘सास बहु आचार’ सर्व पाहिलेला, माझ्या आयुष्यातल्या कित्येक चढ-उतारात माझी साथ दिलेला. अप्रतिम कलाकार आणि लाखमोलाचा माणूस. त्यानं ‘बस बाई बस’ या कार्यक्रमासाठी माझ्याशी साधलेला हा संवाद म्हणूनच माझ्यासाठी अनमोल आहे. मला झी मराठीनं ‘अवघाची संसार’ मुळे घरोघरी पोहोचवलं, या चॅनलची मी सदैव ऋणी राहीन. या चॅनेलवर होणारं हे कौतुक माझ्यासाठी माहेरपणाच्या कौतुकाची भावना देणारं आहे”.

जाहिरात

‘बस बाई बस’ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या पहायला मिळतात. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सुबोध भावे निरनिराळे प्रश्न विचारतात. आता अमृता काय काय प्रश्न विचारणार हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. हेही वाचा -  Bigg Boss Marathi चा चौथा सीजन पुन्हा लांबणीवर? समोर आलं कारण दरम्यान, अमृता नुकतीच एका सुंदर वेबसिरीजमधून समोर आली. ‘सास बहु आचार प्रायव्हेट लिमिटेड’ असं या सिरीजचं नाव असून यामध्ये सासू सुनेचं एक गोड नातं बघायला मिळालं होतं. याशिवाय अमृता सध्या पुनःश्च हनिमून नाटकात आपला नवरा संदेश कुलकर्णी सह दिसली. अमृतानं मराठी ते हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात