Home /News /entertainment /

अभिनेत्रींना दुह्यम स्थान का मिळतं? अमोल पालेकर यांचा बॉलिवूडला सवाल

अभिनेत्रींना दुह्यम स्थान का मिळतं? अमोल पालेकर यांचा बॉलिवूडला सवाल

अभिनेत्री केवळ संतोषी माता, भारता माता किंवा आयटम गर्ल म्हणून चित्रपटात झळकायच्या असंही ते म्हणाले.

    मुंबई 20 ऑगस्ट: अभिनेत्रींना भारतीय चित्रपटांमध्ये कायमच दुह्यम स्थान दिलं जातं. काही अपवादात्मक चित्रपट वगळता अभिनेत्री कायमच हिरोंच्या पाठिमागे उभ्या राहिलेल्या दिसतात. (bollywood movies) मात्र या पुरूषप्रधान संस्कृतीला OTT प्लॅटफॉर्ममुळे वचक बसला असं मत जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी व्यक्त केलं. यापूर्वी अभिनेत्री केवळ संतोषी माता, भारता माता किंवा आयटम गर्ल म्हणून चित्रपटात झळकायच्या असंही ते म्हणाले. अमोल पालेकर हल्ला 200 या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटात ते एका निवृत्त न्यायाधिषाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या भूमिकेवर भाष्य केलं. ते म्हणाले, “दुर्दैवाने, जर आपण आपल्या मुख्य प्रवाहातील सिनेमांकडे पाहिलं तर एका विशिष्ट प्रकारच्या साचेबद्ध भूमिका नायिका साकारायच्या. एकेकळी अभिनेत्री एकतर संतोषी माँ किंवा भारत माता असायची. किंवा एखाद्या आयटमनंबरमध्ये झळकायची. स्त्रीकेंद्रित सिनेमा हे दुर्मिळ होते पण ओटीटीच्या उदयामुळे महिला पात्रांसाठी उत्कृष्ट पटकथा लिहिल्या गेल्या.” बुरख्याशिवाय फिरायची अफगाणी पॉपस्टार; जंग जंग पछाडणाऱ्या तालिबानच्या हातावर तुरी देऊन झाली पसार एक दिग्दर्शक म्हणून आपण कायमच महिलांचं सामर्थ्य त्यांच्यातील शक्ती मांडण्याचा प्रयत्न केल्याचं अमोल पालेकर म्हणाले. तसचं ओटीटीमुळे अनेक नवीन, हुशार कलाकार वेब सीरिजच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करत आहेत. त्यामुळे स्टार्सची मक्तेदारी कमी झाल्याचा आनंद असल्याचं ते म्हणाले.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Bollywood actress

    पुढील बातम्या