Home /News /entertainment /

हार्ट अटॅक कसा येतो? जॉन अब्राहमने पाजळलं ज्ञान; मेडिकलचे विद्यार्थीही शॉक, Video Viral

हार्ट अटॅक कसा येतो? जॉन अब्राहमने पाजळलं ज्ञान; मेडिकलचे विद्यार्थीही शॉक, Video Viral

जॉन अब्राहमचं उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल...

    नवी दिल्ली, 9 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) काही सेलेब्रिटीज (Celebrities) सतत सक्रिय असतात. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. सतत आपले फोटो, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना अपडेट्स देत असतात. चाहतेही आपल्या आवडत्या कलाकारांच्या पोस्ट्सना, व्हिडिओजना भरभरून दाद देत असतात. आपल्या आवडत्या कलाकाराची एखादी गोष्ट आवडली तर चाहते अगदी दिलखुलास दाद देतात; मात्र एखादी गोष्ट आवडली नाही किंवा पटली नाही तर त्याबाबत नाराजी व्यक्त करायला किंवा त्याविरुद्ध प्रतिक्रिया देण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. अनेकदा सेलेब्रिटीज आपल्याला फारसं ज्ञान नसणाऱ्या विषयाबाबतदेखील बिनदिक्कत बिनधास्तपणे वक्तव्य करतात. अशा वेळी चाहते त्यांना बरोबर सुनावतात. असं झालं, तर सोशल मीडियावर सेलेब्रिटीजना चांगलंच ट्रोल (Troll) केलं जातं. सध्या बॉलिवूड (Bollywood) स्टार जॉन अब्राहमला (John Abraham) त्याच्या एका वक्तव्यावरून ट्रोल केलं जात आहे. 'द क्विंट'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. जॉन अब्राहमने अलीकडेच त्याच्या सत्यमेव जयते-2 (Satyamev Jayate-2) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिव्या खोसला कुमार हिच्यासह 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली. यात जॉन अब्राहमने चक्क हार्ट अॅटॅक (Heart Attack ) कसा येतो हे सांगितल्याचं समोर आलं आहे. या शोमधली 15 सेकंदांची एक क्लिप (Video Clip) सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यावरून जॉन अब्राहमची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. जॉनचं या क्लिपमधलं बोलणं, हातवारे हे सगळं बघून सोशल मीडियावरचे युझर्स चित्रविचित्र कमेंट्स करत आहेत. मेडिकलच्या काही विद्यार्थ्यांनी तर जॉनच्या या वक्तव्यावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. 'तो काय बोलला हे आम्हीदेखील समजावून सांगू शकत नाही. कारण आम्हालाही ते समजलेलं नाही, तर चला जॉनकडून ते ऐकू या!' अशी टिप्पणी मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी (Medical Students) ट्विटरवर (Twitter) केली आहे. इतरही अनेकांनी जॉनच्या या अजब वागण्याबद्दल कमेंट्स केल्या आहेत. काही युझर्सनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक आणि परीक्षक अर्चना पूरणसिंग यांची अक्षरशः कीव केली आहे. प्रेक्षक आणि अर्चना पूरणसिंग यांना जॉनचं हे अगाध ज्ञान स्तब्ध चेहरे ठेवून ऐकावं लागत आहे, याबद्दल युझर्सनी त्यांच्याप्रति सहानुभूती व्यक्त केली आहे. एका युझरने वेलकम चित्रपटातला नाना पाटेकर यांचा फोटो शेअर करून 'कंट्रोल उदय ...कंट्रोल!' असं त्यावर लिहिलं आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांनाही असा आत्मविश्वास लाभावा अशी उपहासात्मक टिप्पणी या युझरने केली आहे. 'आमचं सगळं आयुष्य खोटं ठरलं' अशी प्रतिक्रिया मेडिकलच्या अन्य एका विद्यार्थ्याने केली आहे. 'आरआयपी मेडिकल सायन्स!' अशी टिप्पणीही एका युझरने केली आहे. ट्विटरवर अशा एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स पाहायला मिळत असून, युझर्सनी जॉनला ट्रोल (Troll) करण्याच्या बाबतीत कोणतीही कसर सोडलेली नसल्याचं स्पष्ट होत आहे.
    First published:

    Tags: Heart Attack, John abraham, Kapil sharma

    पुढील बातम्या