जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अमिताभ बच्चन यांच्यावर बनला मजेशीर Meme, मिनिटांत झाला Viral, जया-रेखाशी आहे संबंध

अमिताभ बच्चन यांच्यावर बनला मजेशीर Meme, मिनिटांत झाला Viral, जया-रेखाशी आहे संबंध

अमिताभ बच्चन यांच्यावर बनला मजेशीर मीम

अमिताभ बच्चन यांच्यावर बनला मजेशीर मीम

Amitabh Bachchan Viral Meme: बॉलिवूडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा आजही दबदबा कायम आहे. या वयातसुद्धा अमिताभ बच्चन पडद्यावरच नव्हे तर सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय आहेत.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 मे- बॉलिवूडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा आजही दबदबा कायम आहे. या वयातसुद्धा अमिताभ बच्चन पडद्यावरच नव्हे तर सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय आहेत. अमिताभ बच्चन सतत आपल्या पोस्ट आणि ट्विटमुळे चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक ट्विटमधून नेहमीच काहीतरी हटके पाहायला मिळत असतं. अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही तितकीच आहे.सध्या बिग बी आपल्या कोणत्याही ट्विटमुळे नव्हे तर एका मिम्समुळे चर्चेत आले आहेत. अमिताभ यांच्या या मिम्सचा संबंध रेखा आणि पत्नी जया यांच्याशीसुद्धा आहे. सोशल मीडियावर सध्या हे मिम्स जोरदार व्हायरल होत आहे. नुकतंच ट्विटरवर आपल्या नावा समोरील ब्ल्यू टिक हटवल्याने अमिताभ बच्चन यांनी मजेशीर शब्दांत ट्विटरची फिरकी घेतली होती. बिग बींच्या या ट्विटची जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान आता अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेचं कारण अमिताभ यांचं कोणतंही ट्विट किंवा पोस्ट नाहीये. तर यावेळी बिग बी एका हटके मिम्समुळे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या मिम्समध्ये अमिताभ एकटे नसून त्यांच्यासोबत चार दिग्गज महिलासुद्धा आहेत. पाहूया नेमकं काय आहे प्रकरण. (हे वाचा: सनी देओलचा मुलगा बांधणार लग्नगाठ, गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे अभिनेत्याची होणारी सून? ) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या मिम्समध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत आणखी चार जणींची नावे जोडली गेली आहेत. या मिम्समध्ये बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी, रेखा, जया बच्चन आणि सुषमा स्वराज याचौघींचा समावेश आहे. रेखा, जया, हेमा आणि सुषमा यांची नावे एकत्र आल्याने हे मिम्स कशाबाबत असेल याची कल्पना आता तुम्हाला आलीच असेल. तुम्ही ओळखल्याप्रमाणे हा मिम्स वॉशिंग पावडर निरमाच्या टीव्ही जाहिरातीवर आधारित आहे. या मिम्समध्ये बिग बींची तुलना वॉशिंग पावडर निरमाशी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा मीम पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हा मीम देसी नारी ऑफिशियलने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पोस्ट केल्याच्या काही मिनिटांतच या मिम्सवर लाखो व्ह्यूज आणि कमेंट्स आल्या आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहलंय, “हेमा, रेखा, जया और सुषमा सबकी पसंद बच्चनवा.. बच्चनवा”. तर दुसऱ्या एकाने लिहलंय, “अमिताभ बच्चन स्वतः निरमा आहेत, परंतु ते जाहिरात डिटर्जंट पावडरची करतात'.

News18लोकमत
News18लोकमत

अमिताभ बच्चन यांच्या कामाबाबत सांगायचं तर, लवकरच साऊथ स्टार प्रभास आणि क्रिती सेननच्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी ते रश्मिका मंदानासोबत ‘गुड बाय’मध्ये दिसले होते. तर यासोबतच परिणीती चोप्राच्या ‘उंचाई’ चित्रपटातसुद्धा बिग बी झळकले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात