अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा बॉलीवूड इंडस्ट्रीपासून दूर राहणं पसंत करत असली तरी, ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या स्टार किड्सच्या यादीत नव्याचं नाव सामील आहे. इतरांप्रमाणेच नव्यादेखील सोशल मीडिया प्रेमी आहे. (फोटो सौजन्य : Instagram@navyananda)
दरम्यान, नव्या नवेली नंदाने इंस्टाग्रामवर तिच्या जपानमधील सुट्टीतील काही फोटो शेअर करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ती सध्या जपानची राजधानी टोक्यो येथे आहे. तिथे ती तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. (फोटो क्रेडिट्स : Instagram @navyananda)
या फोटोंमध्ये, नव्याने डेनिम पँटसह निळ्या रंगाचा किमोनो-स्टाईल टॉप परिधान केलेला दिसतो. (फोटो क्रेडिट्स : Instagram @navyananda)
हे फोटो शेअर करत नव्याने 'टोक्योमध्ये एक रविवार' असे कॅप्शन लिहिले आहे. यशस्वी बिझनेस वुमन नव्याच्या फोटोंसोबतच तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही व्हिडिओही शेअर केले आहेत. चाहत्यांना हे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडले आहेत. (फोटो सौजन्य : Instagram@navyananda)
या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये, नव्या नवेली जपानची संस्कृती, पाककृती आणि पर्यटनाची झलक शेअर करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : Instagram@navyananda)
या फोटोमध्ये नव्या जपानी टोपी घालून देशी खाद्यपदार्थांचा आनंद घेताना दिसत आहे. कधी ती टोकियोच्या नदीच्या मधोमध जाऊन फोटो क्लिक करताना दिसते, तर कधी तिथल्या रस्त्यांचा आणि इतर सुंदर गोष्टींचा आनंद घेताना दिसते. (फोटो सौजन्य : Instagram@navyananda)
नव्या नवेली नंदाने तिची आई श्वेता बच्चन-नंदाप्रमाणेच बॉलीवूडमध्ये प्रवेश केलेला नाही. परंतु, बॉलिवूडशी असलेल्या तिच्या संबंधांमुळे ती चर्चेत राहते. नव्याला तिच्या आई आणि वडिलांप्रमाणे एक यशस्वी व्यावसायिक महिला बनण्याची नेहमीच इच्छा होती आणि ती या क्षेत्रात आपलं करिअर करत आहे. (छायाचित्र सौजन्य Instagram@navyananda)
कामाव्यतिरिक्त, नव्या अनेकदा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत तिचं डेटिंग सुरू असल्याच्या अंदाजांमुळे चर्चेत असते. त्यांनी त्यांच्या डेटिंगच्या अंदाजांवर भाष्य केलं नसलं तरी ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. यामुळे त्यांच्याबद्दलच्या अंदाजांना खतपाणी मिळतं. (फोटो क्रेडिट्स Instagram@navyananda)