बच्चन कुटुंबासाठी चाहत्यांची प्रार्थना; बिग बी अमिताभ यांनी हात जोडून मानले आभार

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर सर्वांचे आभार मानलेत.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर सर्वांचे आभार मानलेत.

  • Share this:
    मुंबई, 12 जुलै : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचा मित्रपरिवार, नातेवाइक, इतर कलाकार आणि चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय ते सर्व बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केली आहेत. या सर्वांचे अमिताभ बच्चन यांनी आभार मानलेत. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली. अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ऐश्वर्या आणि आराध्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे सर्व जण लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. त्यावर अमिताभ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ यांनी ट्वीट केलं आहे, "अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या आणि माझ्यासाठी ज्या सर्वांनी प्रार्थना केली त्या सर्वांचे मी हृदयापासून आभार मानतो. प्रत्येकाला प्रतिक्रिया देणं शक्य नाही. त्यामुळे मी हात जोडून सर्वांचे एकत्र आभार मानतो. तुम्ही दाखवले प्रेम आणि आपुलकीसाठी तुमचे खूप धन्यवाद" शनिवारी रात्रीच बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. हे वाचा - 'वेळच तर आहे निघून जाईल', कोरोनाग्रस्त अमिताभ यांच्या प्रेरणादायी कवितेचा VIDEO यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
    Published by:Priya Lad
    First published: