मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Virat Kohli च्या 'या' गोष्टीमुळे स्वत: बिग बी झालेत Jealous! वाचा काय आहे कारण?

Virat Kohli च्या 'या' गोष्टीमुळे स्वत: बिग बी झालेत Jealous! वाचा काय आहे कारण?

Amitabh Bachchan with Virat Kohli

Amitabh Bachchan with Virat Kohli

भारतीय चित्रपट सृष्टीचे शेहनशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan ) नाराज असल्याची चर्चा बी टाउनमध्ये रंगली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

Virat Kohli या गोष्टीमुळे स्वत: बिग बी झालेत Jealous! वाचा काय आहे कारणमुंबई, 12 डिसेंबर: भारतीय चित्रपट सृष्टीचे शेहनशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan ) सध्या नाराज असल्याची चर्चा बी टाउनमध्ये रंगली आहे. बिग बी यांचे (Bigg B)देशासह जगभरात चाहते पाहायला मिळतात. पण तरीदेखील त्यांना चाहत्यांची कमी भासत आहे. त्यांना याबाबत पोस्ट शेअर करत खंत व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी भारतीय स्टार क्रिकेट विराट कोहलीशी(Virat Kohli)तुलना करत आपल्या नारजीसंदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमी फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा ते फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. मात्र त्यांचे फॉलोअर्स विराट कोहलीच्या तुलनेत फार कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यासंदर्भात त्यांनी भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटची तुलना क्रिकेटपटू विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटशी केली आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर स्वत:चा छान सूटबूट घालून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना ते म्हणाले, “त्याने मला हे पाठवले आणि मला स्वतःकडे बघण्यास सांगितले. मी ते पाहिले आणि इतरांना दाखवले, अशी या पोस्टमागची कथा आहे. पण अजूनही ही संख्या कमी आहे. विराट कोहलीचे सर्वाधिक १६० मिलियन फॉलोअर्स आहेत आणि माझ्याकडे बघा…जेमतेम २९ मिलियन.”

विराट कोहली हा अमिताभ याचा आवडता खेळाडू आहे. अनेकदा तो खेळत असताना बिग बी त्याला चीअर करताना दिसतात. कदाचित त्यामुळेच त्यांनी स्वत:ची तुलना विराट कोहलीसोबत केली आहे. ही तुलना करताना फॉलोअर्सबद्दलचं त्यांचं दु:ख स्पष्ट दिसतंय. अमिताभ इन्स्टावर फॉलोअर्स वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Instagram, Social media, Virat kohli