मुंबई, 7 जानेवारी- बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपण अनेक लव्हस्टोरी (Lovestory) पाहिल्या आहेत. त्यापैकी काही अजरामर झाल्या आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. यातीलच एक जोडी म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची. या जोडीबद्दल अनेक पिढ्यांनी ऐकलं आहे. आणि त्यांना या जोडीबद्दल माहिती करून घ्यायला आजही आवडतं. अमिताभ आणि रेखा यांच्याबद्दल अनेक किस्से आपण वाचले आहेत. आजही सोशल मीडियावर रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल आवडीने वाचलं जातं. आज आपण अमिताभ आणि रेखा यांचा असाच एक किस्सा पाहणार आहोत. अमिताभ बच्चन यांना मेगास्टार म्हणून ओळखलं जातं. त्या काळातील ते सर्वात यशस्वी अभिनेता मानले जातात. 1990 च्या दशकातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता म्हणून त्यांना ओळखले जाते. तर दुसरीकडे रेखा या त्या काळातील अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं होतं. आजही त्या आपल्या सौंदर्याने सर्वांना थक्क करतात. या दोन्ही मोठ्या कलाकारांना एकत्र पाहणं म्हणजे पर्वणीच होती. अमिताभ आणि रेखा ही बॉलिवूडमधील एक एव्हरग्रीन जोडी आहे. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत होती. या दोघांची केमिस्ट्री पडद्यावर इतकी सुपरहिट होती, की चाहत्यांना त्यांनी खऱ्या आयुष्यात एकत्र यावं असं वाटत होतं.
अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत होत्या. या दोघांनी कधीही या गोष्टीवर जाहीरपणे सांगितलं नाही. परंतु त्यांची केमिस्ट्री फार काही सांगून जात होती. अनेकवेळा त्यांच्या प्रेमाच्या, लग्नाच्या बातम्याही वाचायला मिळाल्या होत्या. परंतु अमिताभ बच्चन यांचं लग्न झालं होतं. त्यामुळे त्यांनी कधीही या गोष्टी खुलेपणाने मान्य केलं नसल्याचं म्हटलं जातं. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची ही ओळख ‘दो अनजाने’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या सेटवर रेखा आणि अमिताभ बच्चन यांची पहिल्यांदा भेट झाली होती. यावेळी रेखा अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्वाने फारच प्रभावित झाल्या होत्या. (हे वाचा: बिन फेरे हम तेरे! हे बॉलिवूड स्टार्स होते ‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ) अमिताभ यांना आवडत नव्हती रेखा यांची ही सवय- अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी पहिल्यांदा ‘दो अनजाने’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. सिमी गरेवाल यांच्या एका चॅट शोमध्ये रेखा यांनी सांगितलं होतं , ‘दो अनजाने’ च्या शुटिंवेळी अमिताभ बच्चन यांना माझी एक सवय अजिबात आवडत नव्हती. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘मी या चित्रपटावेळी सिनियर होते. परंतु ‘दिवार’ च्या लोकप्रियतेनंतर अमिताभ यांची प्रचंड क्रेझ होती. मी त्यांना पाहताच इम्रेस झाले होते. मी त्यांच्यासारखा व्यक्ती कधीच नव्हता पहिला. ते प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होते. ते आपल्या कामासाठी फारच वेडे होते. मी सेटवर रोज उशिरा जात होते. त्यामुळे ते माझ्यावर फार चिढत असत. त्यांना माझी ही सवय अजिबात आवडत नव्हती. एके दिवशी त्यांनी मला याबद्दल ठणकावून सांगितलं. आणि आपल्या कामाला गांभीर्याने घेण्यास सांगितलं. मी त्यांच्या बोलण्याने फारच प्रभावित झाले. त्यांनतर मी सेटवर वेळेत यायला चालू केलं’.