लॉस एँजेलेस, 20 फेब्रुवारी : अमेरिकन सेलिब्रिटी (Hollywood) असलेली किम कार्दीशियन (Kim Kardashian) आणि पती कान्ये वेस्ट (Kanye West) यांच्यामध्ये मतभेद वाढल्याच्या अनेक चर्चा सुरू होता. पण आता किमने आपल्या पतीपासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किम आणि कान्येमध्ये सर्व काही ठीक नसल्याच दिसत होतं. आता अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला असून, या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब केला आहे. अमेरिकन रिअॅलिटीशोची स्टार असलेली किम कर्देशिअनने 7 वर्षांपूर्वी कान्ये वेस्ट या rapper सोबत लग्न केलं होत. या सेलेब्रेटी जोडप्याला एकूण 4 मुलं आहेत. लग्नाच्या तब्बल 7 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांना 4 मुलं असून त्यात 7 आणि 3 वर्षाच्या मुली क्रमश नॉर्थ आणि शिकागो या आहेत. तर 5 वर्षांचा मुलगा सेंट, आणि 21 महिन्याचा एक मुलगा असा समावेश आहे. किम सध्या आपल्या मुलांसोबत लॉस एन्जेलेसला राहते तर कान्ये वीयोमिंगमध्ये राहतो. (वाचा : मलायकाच्या आई वडिलांना भेटायला गेला अर्जुन; लग्नाच्या चर्चेला पुन्हा उधाण ) किमच्या म्हणण्यानुसार कान्ये हा गेल्या काही दिवसांपासून बायपलोर डीसॉर्डर या मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या वर्तवणूकीतही मोठा फरक झाला होता. त्याच्यासोबत राहणं कठीण झालं होतं. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. आणि शेवटी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. किमने केलेल्या अर्जात आपल्या चारही मुलांची कस्टडी स्वतःकडे मागितली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.