जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अमिषा पटेलनं केला कोट्यवधींचा Fraud? व्यावसायिकानं खेचलं कोर्टात

अमिषा पटेलनं केला कोट्यवधींचा Fraud? व्यावसायिकानं खेचलं कोर्टात

अमिषा पटेलनं केला कोट्यवधींचा Fraud? व्यावसायिकानं खेचलं कोर्टात

झारखंडमधील एका व्यावसायिकाकडून तिनं चित्रपट निर्मितीच्या नावाखाली 2 कोटी 50 लाख रुपये घेतले होते. परंतु तिने हे पैसे अद्याप परत केलेले नाहीत. सध्या हे प्रकरण झारखंड उच्च न्यायालयात सुरु आहे. (Rs 2 crore fraud)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 26 फेब्रुवारी : ग्लॅमरस अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्यावर आर्थिक फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत. झारखंडमधील एका व्यावसायिकाकडून तिनं चित्रपट निर्मितीच्या नावाखाली 2 कोटी 50 लाख रुपये घेतले होते. परंतु तिने हे पैसे अद्याप परत केलेले नाहीत. शिवाय तिनं दिलेला चेक देखील बाऊंस झाला असा आरोप अमिषावर करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण झारखंड उच्च न्यायालयात सुरु आहे. (Rs 2 crore fraud) या प्रकरणाची सुनावणी झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आनंद सेन यांनी केली. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं न्यायाधीशांनी त्यांच्या घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी केली. या सुनावणी दरम्यान अमिषानं तिच्यावरील आरोप फेटाळून लावले. त्यामुळे न्यायाधीशांनी तिला पुरावे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. शिवाय हे प्रकरण मध्यस्थी करुन सोडवण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. अवश्य पाहा - या सेलिब्रिटीचे 2 Dogs चोरीला; जो शोधेल त्याला मिळणार तब्बल 3 कोटी अमिषाच्या कंपनीचं नाव लव्हली वर्ल्ड एंटरटेन्मेंट देसी मॅजिक असं आहे. ही कंपनीला चित्रपट निर्मितीसाठी अजय कुमार सिंह नामक एका व्यावसायिकानं अडिच कोटी रुपये दिले होते. याबदल्यात त्याला चित्रपटाच्या एकूण नफ्यापैकी काही भाग मिलणार होता. परंतु गेली तीन वर्ष या कंपनीनं कुठल्याची चित्रपटाची निर्मिती केली नाही. त्यामुळे संतापलेल्या अजयनं आपले पैसे परत मागितले. परंतु अमिषाने मात्र पैसे परत करण्यास नकार दिला. शिवाय त्याला मिळालेला चेक देखील बाऊंस झाला. असा आरोप त्याने अमिषाविरोधात केला आहे. यापूर्वी देखील एका व्यावसायिकानं अमिषावर आर्थिक फसवणूकीचे आरोप केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात