मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Koffee With Karan 7: 'माझे सगळे भाऊ माझ्या मैत्रिणींबरोबर झोपलेत'; सोनमनं उघड केली कपूर खानदानातील सगळी सिक्रेट्स

Koffee With Karan 7: 'माझे सगळे भाऊ माझ्या मैत्रिणींबरोबर झोपलेत'; सोनमनं उघड केली कपूर खानदानातील सगळी सिक्रेट्स

कॉफी विथ करणच्या पुढच्या एपिसोडचे गेस्ट अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि अभिनेता अर्जुन कपूर असणार आहेत. हे दोघे भाऊ-बहिण येणाऱ्या एपिसोडमध्ये काय धमाल, मस्ती आणि खुलासे करणार हे प्रोमोवरुन पहायला मिळतंय.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 9 ऑगस्ट : 'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन (Koffee With Karan 7) सुरु झाला असून यावर्षीच्या सीझनला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नुकताच कॉफी विथ करणचा अपकमिंग एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. करणच्या पुढच्या एपिसोडचे गेस्ट अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि अभिनेता अर्जुन कपूर असणार आहेत. हे दोघे भाऊ-बहिण येणाऱ्या एपिसोडमध्ये काय धमाल, मस्ती आणि खुलासे करणार हे प्रोमोवरुन पहायला मिळतंय. सहाव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये करण जोहर सोनम कपूरला तिच्या भावांविषयी प्रश्न विचारतो. तुझ्या मैत्रिणींपैकी अर्जुन कोणासोबत झोपला आहे किंवा रिलेशनशिपमध्ये आहे, सोनम म्हणते की मी त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. मात्र माझ्या सर्व भावांमध्ये कोणीही शिल्लक नाही जे माझ्या फ्रेंडसोबत झोपलं नाहीये. सोनम कपूरचे हे शब्द ऐकून अर्जुन कपूरला धक्काच बसतो. यावर करण म्हणतो 'यार तुझे भाऊ कसे आहेत'. तर अर्जुन म्हणतो 'ही कसली बहीण आहे, तू असं कसं सांगू शकते'. हेही वाचा -  Pradeep Patwardhan: 'मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं'; मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली सोनमचं हे वक्तव्य सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याशिवाय करणनं अर्जुनलाही अनेक प्रश्न विचारलेले पहायला मिळाले. मलायकाचा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये काय नावानं सेव्ह आहे. यावर अर्जुन म्हणतो मला तिचं नाव खूप आवडतं. त्यामुळे तिचा नंबर मलायका नावानंच सेव्ह आहे. बॉलिवूडमध्ये ग्लॅमरस सेलिब्रिटी कलाकार या शोमध्ये हजेरी लावतात. या सेलिब्रिटींना करण काही खाजगी प्रश्न विचारतो, तर अनेक गेमही खेळतो. व्हायरल झालेल्या या प्रोममध्ये सोनम तिच्या भावाची म्हणजेच अर्जुन कपूरची खिल्ली उडवताना दिसत आहे. या दोघांनाही करण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारतोय. दरम्यान, सहाव्या एपिसोडचा प्रोमो फारच मनोरंजक असल्याचं दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण एपिसोड पाहून आणखीन काय नवीन गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: Arjun kapoor, Karan Johar, Social media, Sonam Kapoor

पुढील बातम्या