
अलका ताईंनी शुटींगमध्ये कलाकारांना आपल्या हातांनी जेवण देखील करुन खाऊ घातलं. त्यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

त्यांनी हिंदीमध्ये काही ओळी लिहिल्या आहेत. त्या म्हणतायत, 'हर मंजिल की एक पहचान होती है, और हर सफ़र की एक कहानी'.

'मन सुंदर असलं की फोटोही छान येतात', 'अलका ताई फार गोड आलाय', असं म्हणत अलका ताईंच्या फोटोला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

अलका ताई लंडनमध्ये अभिनेत्री पूजा सावंत, सिद्धार्थ चांदेकर, अंजिक्य देव यांच्याबरोबर शुटींग करत आहेत.

Congratulations या सिनेमाच्या निमित्तानं अंजिक्य देव आणि अलका ताईंनी अनेक वर्षांनी भेट झाली. माहेरची साडी सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं.




