मुंबई, 29 ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसा ठी हे वर्ष खूप चांगलं ठरलं. आलिया यंदा वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली. आलियाने फारच कमी वयात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर ‘आरआरआर’ आणि त्यानंतर ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात हिट ठरला. आलियासाठी हे वर्ष फक्त व्यावसायिकदृष्ट्याच नव्हे तर वैयक्तिकदृष्ट्यासुद्धा प्रचंड महत्वाचं ठरलं. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, ही अभिनेत्री रणबीर कपूरसोबतच्या आपल्या लग्नामुळे आणि आता तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री लवकरच आई बनणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आईबाबा बनणार आहेत. आलिया भट्टच्या घरी नोव्हेंबर महिन्यात कधीही छोट्या पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. आलियाची डिलिव्हरीची तारीख नोव्हेंबरमध्ये असल्याचं समोर आलं आहे. मात्र ती कोणत्या दिवशी मुलाला जन्म देणार आहे. यावरुन अद्याप पडदा हटवण्यात आलेला नाहीय. ETimes च्या रिपोर्टनुसार, आलिया 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान आपल्या बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे.हे वृत्त समोर येताच आलिया आणि रणबीरचे चाहते आनंदी झाले आहेत. **(हे वाचा:** Diwali 2022: सासरी पोहोचली प्रेग्नेंट आलिया भट्ट; थाटामाटात केलं लग्नानंतरच पहिलं लक्ष्मी पूजन ) या रिपोर्टनुसार, मावशी शाहीन भट्टच्या वाढदिवसाच्या आसपास आलिया आणि रणबीरच्या मुलाचा जन्म होऊ शकतो. आलियाची बहीण शाहीन भट्टचा वाढदिवस 28 नोव्हेंबरला आहे. इथून पुढे भट्ट कुटुंब आता नोव्हेंबर महिन्यात दोन वाढदिवस साजरे करणार हे नक्की आहे. नुकतंच आलिया भट्टचं डोहाळ जेवण घालण्यात आलं होतं. यामध्ये आलिया आणि रणबीरचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मैत्रीण उपस्थित होते. या डोहाळ जेवणाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. फोटो समोर येताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यामध्ये आलिया पिवळ्या रंगाच्या चुडीदारमध्ये दिसली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये आलिया भट्ट आपल्या कामात प्रचंड व्यग्र होती. अभिनेत्री आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. आलिया गरोदर असूनसुद्धा सतत विविध शहरांमध्ये प्रवास करत होती. विविध कार्यक्रमांत भाग घेत होती. त्यामुळे तिला सध्या आरामाची गरज असावी असं म्हटलं जात आहे. त्यामुळेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यंदा कोणत्याही दिवाळी पार्टीत दिसून आले नाहीत. आलिया आणि रणबीर कपूर सध्या एकमेकांसोबत आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं पसंत करत आहेत.
आलिया भट्टने यावर्षी एप्रिलमध्ये रणबीर कपूरसोबत लग्न केलं होतं. आलिया भट्टने जूनमध्ये इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नेंसीची बातमी शेअर केली होती. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी तब्बल 9 वर्षांचा कालावधी लागला होता. त्यामुळे चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच आलिया आणि रणबीर कपूरने लग्नदेखील केलं होतं.

)







