बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्याला करायचाय अक्षय कुमारचा बायोपिक

बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्याला करायचाय अक्षय कुमारचा बायोपिक

बँकॉकच्या हॉटेलमध्ये शेफ ते बॉलिवूडचा सुपरस्टार असा अक्षयचा प्रवास थक्क करणारा आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोंबर : बॉलिवूडमधला अॅक्शन हिरो विद्युत जामवाल हा आपल्या स्टंट साठी ओळखला जातो. या अभिनेत्याने आपली एक खास इच्छा व्यक्त केलीय. अक्षय कुमार हा विद्युतचं रोल मॉडेल असून त्याला अक्षयचा बायोपीक करण्याची इच्छा आहे. बॉलिवूडमध्ये जर कोणी अक्षय कुमारवर चित्रपट बनविणार असेल तर मला त्यात अक्षयचा रोल करायला आवडेल असं विद्युतने एका मुलाखतीत म्हटलं आहे. अक्षय कुमारही आपल्या खास स्टंटसाठी ओळखला जातो. त्याने अनेक सुपरहीट चित्रपट दिले असून आता तो निर्मितीच्या क्षेत्रातही उतरलाय. विद्युत म्हणतो अक्षय आणि माझ्या आयुष्यात अनेक सारख्या घटना घडल्या आहेत.

बँकॉकच्या हॉटेलमध्ये शेफ ते बॉलिवूडचा सुपरस्टार असा अक्षयचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याचा हा प्रवास प्रेरणादायी असू त्यापासून खूपच शिकण्यासारखं आहे. चित्रपटात अक्षय हा आपले स्टंट हा स्वत:च करतो. तर मीही आपले स्टंट स्वत:च करतो असंही त्याने सांगितलंय.

'दीपिकानं मला घरातून बाहेर काढण्याचा प्लान केला होता', आईचा धक्कादायक खुलासा!

अॅक्शन पटांना भविष्यात चांगली मागणी येणार असून माझ्या चित्रपटात त्याचा भरपूर मसाला असतो असतो. भारतीय स्टंट विदेशी चित्रपटांपेक्षा जास्त चांगले असतात असं मतही त्याने व्यक्त केलंय. अक्षय कुमार गेल्या काही वर्षात आपल्या चित्रपटांमुळे आणि इतर कामांमुळे चांगलाच गाजतोय.

बॉलिवूडच्या मस्तानीनं नाकारलेले सलमानचे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट

सामाजिक संदेश देणारे अनेक चित्रपट त्याचे प्रचंड प्रमाणावर गाजले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्याने घेतलेली मुलाखतही चांगलीच गाजली होती. जे अभिनेते बॉलिवूडमध्ये जास्त मानधन घेतात त्यात अक्षयचा समावेश होतो. त्याच प्रमाणात तो सामाजिक कार्याला मदतही  करत असल्याने त्याची कायम चर्चा असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 02:37 PM IST

ताज्या बातम्या