मुंबई, 07 जानेवारी: कोरोना व्हायरस (Corona Virus) आणि त्यामुळे सुरू झालेला लॉकडाऊन (Lockdown) याचा सर्वात जास्त फटका मनोरंजन विश्वाला बसला. अनेक महिने शूटिंग बंद होती. आता सगळी गाडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक सिनेमांची शूटिंग रखडली. त्याचा परिणाम असा झाला की, जे चित्रपट 2020 च्या शेवटी रिलीज होणार होते. त्यांच्या रिलीज डेट पुढे गेल्या असंच काहीसं झालं आहे, अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सिनेमांबद्दल. लक्ष्मी (Laxmii) सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बच्चन पांडे या सिनेमाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात केली आहे. अक्षय कुमारने त्याच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या सिनेमामध्ये तो एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षयने काळ्या रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाची जीन्स घातली केली आहे. तसंच डोक्यावर लाल रंगाचा पंचा गुंडाळला आहे. त्याचा हा लूक सध्या तुफान हिट होत आहे. अक्षय कुमारची साजिद नाडियादवालासोबतही ही 10 वा फिल्म आहे.
फरहाद समजी हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. अभिनेत्री कृती सेनॉनसोबत अक्षय या सिनेमात दिसेल. अक्की बच्चन पांडेमध्ये एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याला अभिनेता व्हायचं असतं. सिनेमाच्या नावावरुनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. 30 दिवस राजस्थानमध्ये शूट केल्यानंतर अक्षय कुमार परतणार आहे. नाडियादवाला यांच्या ग्रँडसन एन्टरटेंन्मेंटच्या बॅनरखाली हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बच्चन पांडेमध्ये अक्षय कुमार, कृती सेनॉन यांच्यासोबत जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असेल. चित्रपटात अर्शद वारसीदेखील झळकणार आहे. आता या सिनेमाचा प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.