मुंबई,2 नोव्हेंबर- अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) 2021 च्या दिवाळीला मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षीपासून दोनदा सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यांनतर आता चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी मोठ्या पडद्यावर जोरदार धमाका करणार आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने खूप आधीपासून प्रमोशनला सुरुवात केली आहे. दरम्यान, अक्षय कुमारने दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबतचा (Rohit Shetty) एक फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीने शोलेचा जय-वीरू क्षण पुन्हा रिक्रिएट केला आहे. अक्षय कुमारने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये रोहित शेट्टी बाईक चालवत आहे. तर अक्षय कुमार त्याच्या बाईकच्या मागे उभा आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे पण तो खूपच सुंदर आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अक्षय कुमारने लिहिलं की, "आमचा जय-वीरू क्षण, जेव्हा रोहित शेट्टीने गाड्या उडवण्यापासून ब्रेक घेतला. पण धमाकेदार ऍक्शनसाठी, सूर्यवंशी 5 नोव्हेंबरला सिनेमागृहात नक्की पहा.
रोहित शेट्टी, अक्षय कुमार आणि कतरिना कैफ सध्या 'सूर्यवंशी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सूर्यवंशीमध्ये कतरिना कैफही दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या जोडीने यापूर्वीही अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. दोघांना एकत्र खूप पसंत केलं जातं. बऱ्याच काळानंतर 'सूर्यवंशी'मध्ये दोघे पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
त्याचबरोबर चित्रपटाची दोन गाणीही रिलीज झाली आहेत. 'आयला रे आला' हे पहिलं गाणंही प्रेक्षकांनां खूप आवडलं. अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. त्याचवेळी या चित्रपटाचं दुसरंगाणं 'मेरे यारा गाणे' आहे. हे एक रोमँटिक गाणं आहे. गाण्यात अक्षय आणि कतरिनाची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
(हे वाचा:'माझ्या आयुष्याचं तिसरं चाक' शाहिद कपूरची पत्नी मीरानं दीर ईशानसाठी लिहिली खास..)
या चित्रपटात दोघेही 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच काम करत आहेत. हे रोमँटिक गाणे 11 वर्षांनंतर आले आहे. या गाण्यात दोघांचा प्रेमाच्या सुरुवातीपासून लग्नापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सूर्यवंशीबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत आणि चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Entertainment, Rohit Shetty