मुंबई, 30 नोव्हेंबर : हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणानं संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. सोशल मीडियापासून ते गल्लोगल्ली या प्रकरणाविषयीचा लोकांच्या मनातील संताप व्यक्त होताना दिसत आहे. इतकंच नाही या घटनेनं बॉलिवूडकरांनाही हादरवून सोडलं आहे. या घटनेनंतर बॉलिवूडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी तमिळनाडूतील रोजा बलात्कार प्रकरण, रांचीतील कायदा शाखेच्या विद्यार्थीनीचं बलात्कार प्रकरण आणि निर्भया बलात्कार प्रकरणाचीही आठवण करून देत अशा गुन्हेगारांनी कडक कायदे करण्याची मागणी सुद्धा केली आहे. अभिनेता अक्षय कुमारनं याविषयी ट्वीट करताना लिहिलं, हैदराबाद बलात्कार प्रकरण असो तमिळनाडू असो किंवा मग रांचीतील कायदा शाखेच्या विद्यार्थीनीवर झालेला सामुहिक बलात्कार असो. आपण एक समाज म्हणून प्रत्येक दिवशी हारत आहोत. सर्वांनाच हादरवून सोडणाऱ्या निर्भया केसला 7 वर्ष होऊन गेली मात्र आपली नैतिकता अद्याप बदलेली नाही. आता देशात कडक नियम आणि कायद्यांची गरज निर्माण झाली आहे. हे सर्व बंद होणं गरजेच आहे. हैदराबाद पुन्हा हादरलं, आणखी एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ
या ट्वीटमधून अक्षय कुमारची नाराजी साफ दिसून येत आहे. अक्षयच्या व्यतिरिक्त बॉलिवूडमधील अन्य कलाकारांनीही या घटनेचा निषेध करत दुःख आणि नाराजी व्यक्त केली आहे. ज्यात फरहान अख्तर, शबाना आजमी, टीव्ही शो क्राइम पेट्रोलचा होस्ट अनुप सोनी, अभिनेत्री यामी गौतम यांचा समावेश आहे.
Anger,sorrow ,shock ..how could these inhuman,unimaginable crimes against women still happen despite such strong uproar & awareness ! Do these demons have no fear of punishment or law,,Where are we going wrong & lagging behind as a system & as a society,,,#JusticeForPriyankaReddy
— Yami Gautam Dhar (@yamigautam) November 29, 2019
अभिनेता फरहान अख्तरनं लिहिलं, त्या लोकांनी महिला डॉक्टरसोबत जे केलं ती गोष्ट आपल्याला याची आठवण करुन देते की याआधी अशा घटनांबाबत आपण लगेचच सुनावणी आणि न्याय मिळवून न दिल्यानं आपल्या सोसायटीला आपणच अशाप्रकारे असुरक्षित केलं आहे. या दुःखद घटनेत मी त्यांच्या कुटुंबासोबत आहे. हैदराबादच्या एका हायवेवर ब्रिजच्या खाली एका महिला डॉक्टरचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला होता. या महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितलं की तिची स्कूटी रस्त्यात खराब झाली होती आणि तिला काही लोकांनी मदत देऊ केली होती. या महिला डॉक्टरनं तिच्या बहिणीला फोन करुन सांगितलं होतं की तिला काही लोकांची भीती वाटत आहे. त्यानंतर तिचा फोन बंद झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह हायवेच्या ब्रिजखाली जळलेल्या अवस्थेत मिळाला. या घटनेबाबत सुरुवातीच्या तपासात महिलेवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या केली गेली की नाही यावर शंका व्यक्त केली होती. दरम्यान या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा उर्वरित तपास सुरू आहे.
व्यसनमुक्ती केंद्रातील तरुणींचा कहर, मैत्रिणीला ठार मारून रचला पळून जायचा प्लान
मजुरांनी भरलेला पिकअप पुलावरून कोसळला, 7 जणांचा जागेवरच मृत्यु

)







