जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'शिवासोबत थट्टा करू नका अन्यथा..' अक्षयच्या 'OMG 2' चं पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी दिला 'हा' सल्ला

'शिवासोबत थट्टा करू नका अन्यथा..' अक्षयच्या 'OMG 2' चं पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी दिला 'हा' सल्ला

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे.

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे.

मागच्या तीन वर्षापासून अक्षय कुमारचे चित्रपट हे बॉक्स ऑफीसवर म्हणावी अशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. OMG 2 चित्रपटाचे पोस्टर समोर येताच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या चित्रपटाकडून अक्षयला खूप अपेक्षा आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 जुलै- अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलीवूडमध्ये त्याने अनेक चित्रपट केले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पण मागच्या तीन वर्षापासून अक्षय कुमारचे चित्रपट हे बॉक्स ऑफीसवर म्हणावी अशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. बॉक्स ऑफिसवर त्याचे चित्रपट सातत्याने प्रदर्शित होत असले तरी, त्याचे सर्वच चित्रपट यशस्वी झालेले नाहीत. आता त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडून हीटची अपेक्षा आहे. दरम्यान, अक्षयने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) बद्दल अपडेट शेअर केले आहे. यासोबतच त्याने चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये तो भगवान शिवाच्या रुपात दिसत आहे. चित्रपटाचे पोस्टर समोर येताच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या चित्रपटाकडून अक्षयला खूप अपेक्षा आहेत. अक्षयने एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात तो महादेवाच्या लुकमध्ये दिसत होता. लांब जटा, अंगभर भस्म आणि हातात डमरू असा अक्षयचा दमदार लुक समोर आला. हे पोस्ट शेअर करत त्याने चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली होती. ‘OMG 2’ (O MY GOD 2 ) हे चित्रपटाचं नाव असून तो 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वाचा- नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त पार पडला खास सोहळा चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर अक्षय कुमार सोबत अभिनेत्री यामी गौतम, अभिनेता पंकज त्रिपाठी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सोबतच अनेक कलाकार आणि वेगळ्या धाटणीच्या विषयावर आधारित हा चित्रपट असेल असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीणच वाढली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अक्षय कुमारच्या या दोन्ही पोस्टवर कमेंट करून यूजर्स प्रेम व्यक्त करत आहेक आणि चित्रपटाबद्दल उत्सुक असल्याचे सांगत आहेत. तर काही नेटकरी त्याला इशारा देत आहेत की, श्रावण महिन्यात भगवान शिवासोबत कोणतीही थट्टा किंवा विनोद करू नका, अन्यथा ते तुम्हाला चांगलेच महागात पडेल. तर काही नेटकरी आदिपुरुष चित्रपट पाहिल्यानंतर ‘OMG 2’ बद्दलची चिंता देखील व्यक्त करत आहेत. एका युजरने अक्षय कुमारला म्हटलं आहे, “आशा आहे की तुम्ही सिनेमात हिंदू धर्माची खिल्ली उडवणार नाही. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘हिंदू देवांचा अपमान करण्याची हिंमतही करू नका.. बेकार बॉलीवूड.’..अशा असंख्य कमेंट यावर आल्या आहेत.

जाहिरात

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो या वर्षी, तो ओह माय गॉड 2 सोबतच Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये आणि टायगर श्रॉफसोबतचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट दिसेल. त्याचबरोबर तो ‘हेरा फेरी 3’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून तो मराठीत एंट्री करणार आहे. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात