जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Akshay Kumar : 'तू सेटवरचं जीवन होतास'; जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक

Akshay Kumar : 'तू सेटवरचं जीवन होतास'; जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक

Akshay kumar

Akshay kumar

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. आज त्याच्या निधनाची बातमी समजताच अक्षय कुमार हताश झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 सप्टेंबर :  बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं  निधन झालं आहे. त्याने सोशल मीडियावर या व्यक्तीसोबत फोटो पोस्ट करत चाहत्यांना हि दुःखद बातमी  दिली आहे. हा व्यक्ती म्हणजे अक्षय कुमारचा  हेअरड्रेसर मिलन जाधव.  यांच्या निधनावर अभिनेत्याने शोक व्यक्त केला आहे. मिलन जाधव याने 15 वर्षांहून अधिक काळ अक्षयसोबत काम केले आणि आज  त्याच्या निधनाची बातमी समजताच अक्षय कुमार हताश झाला आहे. मिलन आता त्याच्यासोबत नाही यावर अक्षयला अजूनही विश्वास बसत नाहीये. बॉलीवूड अभिनेत्याने आपल्या हेअरड्रेसरच्या निधनाची बातमी ट्विटरवर शेअर केली. अक्षयने अतिशय भावुक शब्दात आपल्या हेयरड्रेसरला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने भावपूर्ण संदेशात लिहिले आहे कि, ‘‘तू तुझ्या मजेदार हेयरस्टाईल आणि लाघवी  हास्यासह गर्दीबाहेर उभा असायचास  पण माझा एकही केस हलणार  याकडे तुझं कायम लक्ष्य असायचं. तू सेटवरचं  जीवन होतास. तुझ्यामुळे माझ्या सेटवर कायम चैतन्य असायचं. १५ वर्षांपेक्षा अधिक काळ तू माझा हेयरड्रेसर म्हणून काम केलंस आणि आज तू आम्हा सगळ्यांना सोडून गेलास यावर माझा विश्वास बसत नाही.  मला तुझी आठवण येईल मिलानो… ओम शांती’’ अशा शब्दात अक्षयने भावना व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात

अभिनेत्याने मिलनसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय मिलनसमोर झुकला आहे. आणि मिलन अक्षयचे केस व्यवस्थित करत आहे. अक्षयच्या चाहत्यांनीही मिलनला श्रद्धांजली वाहिली. एका व्यक्तीने लिहिले, “अगदी लहान वयात मरण पावलेल्या लोकांबद्दल ऐकणे खूप कठीण आहे. RIP. मिलान.” दुसरा चाहता म्हणाला, “मिलन खूप चांगला होता….ओम शांती.” एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले, “ही भयानक बातमी आहे. मला त्यांची आठवण येते. आमचा हमको दीवाना कर गया हा त्यांचा पहिला चित्रपट होता आणि त्यानंतर तो तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा एक भाग होता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. दुःखद.” हेही वाचा - Ranveer singh : रणवीर सिंगचा ‘पुष्पा’ अवतार; अल्लू अर्जुन समोरच म्हणाला ‘मै झुकेगा नही’; पहा व्हिडीओ 2019 मध्ये, मिलनने त्याच्या फेसबुक पेजवर अक्षय त्याच्या सलूनला भेट देत असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये, अक्षयने सलूनमध्ये प्रवेश केला आणि इतरांसह मिलनचे स्वागत केले. त्याने लिहिले, “अक्षय सर माझे बॉस इन माय सलून इन मिलानो.” 2017 मध्ये, त्याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर अक्षयसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “अक्की सर माझ्या बॉससोबत मिलनो.” अक्षयच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, त्याचा  नवीन चित्रपट ‘कटपुटली’ या महिन्याच्या सुरुवातीला डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. त्याचबरोबर चाहत्यांना अक्षय जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुच्चासोबत राम सेतूमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सुर्याच्या तामिळ चित्रपट सूरराई पोत्रूच्या हिंदी रिमेकमध्येही तो राधिका मदनसोबत दिसणार आहे. अक्षय आणि राधिका व्यतिरिक्त, परेश रावल तामिळ मूळमधून त्यांची भूमिका पुन्हा साकारणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात