मुंबई, 5 ऑगस्ट : पुणे म्हटलं कि मिसळ आलीच. पुण्याची मिसळ जगात भारी असं पुणेकर नेहमी अभिमानानं सांगतात. या मिसळ खाण्याचा मोह खुद्द अक्षय कुमारही टाळू शकला नाही. रक्षाबंधनाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आलेला असताना त्याने मिसळ पावचा खाण्याचा मनसोक्त आस्वाद घेतला आहे. नुकताच बॉलिवूडचा फिटनेस प्रेमी अक्षय कुमार पुण्यात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्याचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्याच्याच प्रमोशनमध्ये अक्षय कुमार सध्या बिझी आहे. या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भन्नाट गोष्टी करताना दिसत आहे. सध्या इंटरनेटवर त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यात आता अक्षय कुमार चक्क मिसळ पाव खाताना दिसत आहे. हे बघून अक्षयच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. अक्षय कुमार त्याच्या कडक फिटनेस आणि त्याच्या आरोग्यदायी सवयींमुळे लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे हे नाकारता येणार नाही. वयाच्या 54 व्या वर्षीही हा अभिनेता इतका तंदुरुस्त आहे. अक्षयच्या फिटनेस प्रेमाबद्दल सांगायचं झालं तर ‘लवकर निजे, लवकर उठे’ हा फंडा तो पाळतो. त्याने सकाळचा सूर्योदय कधीही चुकवलेला नाही. जेवनातसुद्धा अक्षय कुमार फक्त पौष्टिक पदार्थच खातो. आता एवढा फिटनेस पाळणारा अक्षय डाएट सोडून चक्क मिसळ खातोय म्हंटल्यावर सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. हेही वाचा - Boycott Rakshabandhan: सिनेमा प्रदर्शनाआधीच बॉयकॉट होण्यावर व्यक्त झाला Akshay Kumar; म्हणाला… अभिनेता अक्षय कुमार पुण्यात दुपारच्या जेवणासाठी महाराष्ट्रीयन मिसळ पावाच्या थाळीचा आस्वाद घेताना दिसत आहे. भूमी पेडणेकर सोबत त्याच्या नवीन रक्षाबंधन सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान, अक्षय कुमार त्याच्या क्रू सोबत स्वादिष्ट महाराष्ट्रीयन मेजवानी करताना दिसला. मसालेदार मिसळ पाववर अक्षयने ताव मारला.
अक्षय कुमार मसालेदार मिसळीवर ताव मारताना दिसणं हा एक दुर्मिळ क्षण आहे असं त्याचे चाहते आता म्हणू लागले आहेत. पण स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पारंपारिक पदार्थ अक्षयला खायला नेहमीच आवडतात. त्यामुळे तो मिसळ पावचा आनंद घेत आहे. व्हिडिओमध्ये हा सुपरस्टार त्याच्या सदस्यांसह पौष्टिक मिसळ पाव थाळीचा आनंद घेताना दिसत आहे, ज्यामध्ये तो सदस्यांपैकी एकाला तूप देताना दिसतो. हा अक्षय कुमारचा व्हिडीओ बघताना चाहत्यांच्या तोंडाला पाणी सुटलं यात काही शंका नाही.