मुंबई, 20 सप्टेंबर : प्रत्येक बाप हा आपल्या मुलीसाठी खूप खास असतो. त्याचबरोबर वडिलांसाठीही मुलगी तितकीच लाडकी आणि महत्त्वाची असते. मग ते वडिल सामान्य व्यक्ती असो वा कुठला सुपरस्टार. नुकताच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर त्याच्या मुलीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरु केला आहे. अक्षय कुमार नेहमीच त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित सर्व अपडेट्स सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता त्याचा एक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याची मुलगी नितारासोबत दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमार टेडी डोक्यावर घेऊन फिरताना आणि आपल्या मुलीसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओने आणि कॅप्शनने सगळ्यांचंच मन जिंकलं. हेही वाचा - एकदम झकास! Anil Kapoor च्या फॉरेन व्हर्जनचा सोशल मीडियावर धुमाकूळ; तुम्ही पाहिलात का? “काल माझ्या मुलीला एका पार्कमध्ये घेऊन गेलो. तिच्यासाठी एक नाही तर दोन खेळणी जिंकल्यानंतर तिचे आनंदी हास्य पाहून मला हिरो सारखं वाटलं", असं अक्षयने व्हिडीओ शेअर करत म्हटलं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट आणि लाईक्सचा पाऊस होतोय.
‘तुम्ही मनावर राज्य करता, खूप छान अभिनेता आणि खूप छान वडिल, क्युट वडिल, बेस्ट, हिरो, लव्ह, फायर’, अशा अनेक प्रकारच्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत. त्यांचं वडिल प्रेम पाहून चाहते तर त्याला पुन्हा हृदय देऊन बसले. दरम्यान, अक्षयच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, त्याचा नवीन चित्रपट ‘कटपुटली’ या महिन्याच्या सुरुवातीला डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. त्याचबरोबर चाहत्यांना अक्षय जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुच्चासोबत राम सेतूमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.