मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Akshay Kumar: '...त्याबद्दल मला माफ करा'; असं काय झालं की अक्षय कुमारने प्रेक्षकांची माफी मागितली

Akshay Kumar: '...त्याबद्दल मला माफ करा'; असं काय झालं की अक्षय कुमारने प्रेक्षकांची माफी मागितली

अक्षय कुमार

अक्षय कुमार

लागोपाठ फ्लॉप चित्रपटानंतर 'या' कारणासाठी अक्षयने प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली. नक्की काय घडलं जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 12 नोव्हेंबर : अक्षय कुमार हा बॉलीवूडचा असा सुपरस्टार आहे ज्याच्या नावानेच थिएटरमध्ये गर्दी होते. पण काही काळापासून त्याचे चित्रपट प्रेक्षकांवर आपली जादू टाकण्यात अयशस्वी ठरले आहेत. अक्षयचे एकापाठोपाठ एक चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. आज अक्षय हिंदुस्तान लीडरशिप समिट 2022 मध्ये आला होता आणि त्यादरम्यान त्याने त्याच्या चित्रपटांबद्दल चर्चा केली. यावेळी अक्षयने प्रेक्षकांची हात जोडून माफी देखील मागितली. नक्की काय घडलं जाणून घ्या.

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटांचा बोलबाला नेहमीच असतो. पण 2022 हे वर्ष अक्षय कुमारसाठी चांगले राहिले नाही. यावर्षी त्यांचा एकही चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकू शकला नाही. आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट देणाऱ्या अक्षयला एक हिट चित्रपट मिळावा अशी इच्छा होती. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या नजरा 'हेरा फेरी 3'वर खिळल्या होत्या. जुना अक्षय कुमार या चित्रपटांतून परतेल याची चाहत्यांना प्रतीक्षा होती.पण परेश रावलने 'हेरा फेरी 3' मध्ये कार्तिक आर्यन दिसणार असल्याचे सांगून चाहत्यांची मनं तोडली. आज अक्षयने हिंदुस्थान लीडरशिप समिट 2022 मध्ये हजेरी लावली. तेथे त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. आपण या चित्रपटाचा भाग नसल्याचे अभिनेत्याने स्पष्ट केले.

हेही वाचा - 'हेरा फेरी 3'मध्ये कार्तिक आर्यनची एन्ट्री; अक्षय कुमारला करणार रिप्लेस?

या चित्रपटाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अक्षय म्हणाला, 'हेरा फेरी' हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मला खूप वाईट वाटते की तो पुन्हा तयार होण्यासाठी इतका वेळ गेला. पण मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. यावेळी मी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर खूश नव्हतो, म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी ते करू शकत नाही याचे मला खूप दुःख आहे, परंतु सर्जनशीलतेमुळे मी आता या चित्रपटाचा भाग नाही.

आपला मुद्दा पुढे ठेवत अक्षय खूप भावूक होऊन म्हणाला, 'मी सोशल मीडियावर पाहिले की लोक नो राजू, नो हेरा फेरी म्हणत आहेत. मला स्वतःला खूप वाईट वाटलं माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या चाहत्यांसाठी. पण मी 'हेरा फेरी 3' चा भाग होऊ शकलो नाही याबद्दल मी त्यांची माफी मागतो. मला माफ करा.'

बॉलीवूड चित्रपटांच्या अपयशावर अक्षय म्हणाला, 'मला वाटते आता प्रेक्षकांना काहीतरी वेगळे पहायचे आहे आणि आपण यावर विचार केला पाहिजे. आपण प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणू शकलो नाही ही आपली चूक आहे. यात प्रेक्षकांचा काही दोष नाही. माझ्या मते आता प्रेक्षकांच्या पसंतीनुसार काम करायला हवे. प्रेक्षकांना जे पहायचे आहे ते तुम्हाला सर्व्ह करावे लागेल. आता मला स्वतःला नवीन सुरुवात करायची आहे. मला काहीतरी वेगळे दाखवायचे आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Bollywood actor