बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे दोघेही बॉलिवूडमधील हिट जोडप्यांपैकी एक आहेत. लग्नाच्या 20 वर्षानंतरही त्यांचं प्रेम नवं वाटावं आहे. चित्रपटाच्या पडद्यावर हे दोघं कधीच एकत्र दिसले नाहीत. त्यांचे 20 वर्षांपूर्वीचे हे फोटो VIRAL होत आहेत.
लग्नात ट्विंकल खन्नाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर अक्षय कुमारने पांढरा कुर्ता पायजामा परिधान केला होता.
अक्षय-ट्विंकल यांचं लग्न 17 जानेवारी 2001 रोजी झालं, त्या वेळी अनेकांना धक्का बसला होता. फक्त जवळचे कुटुंबातील सदस्य आणि मित्रच उपस्थित होते.
सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्नाची प्रेमकथा अगदी फिल्मी आहे. जेव्हा अक्षय कुमारने ‘मेला’ चित्रपटाच्या वेळी ट्विंकलला प्रपोज केले तेव्हा ट्विंकलने सांगितलं की जर मेला चित्रपट फ्लॉप झाला तर तिचा होकार असेल. ट्विंकल ला विश्वास होता की मेला हा चित्रपट हिट ठरेल, पण हा चित्रपट फ्लॉप झाला आणि अक्षयची प्रेमकथा हिट ठरली.
अक्षय कुमार आता 'रक्षाबंधन', 'बच्चन पांडे', 'पृथ्वीराज' आणि 'राम सेतु' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचवेळी अक्षयच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बेलबॉटम' 27 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.