भोजपुरी अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम अक्षरा सिंगने ख्रिसमसच्या निमित्ताने कोरिओग्राफर गीता कपूरची भेट घेतली आणि तिच्यासोबत ख्रिसमस पार्टी केली. या सेलिब्रेशनचे काही फोटो तिनं इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये तिचा वेस्टर्न लूक दिसत आहे.
अक्षरा सिंहने तिच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती लाल आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
गीता कपूर आणि अक्षरा सिंह यांनी ख्रिसमस साजरा करताना चांगलीच मस्ती केली आहे. यावेळी त्यांचे काही क्लोज फ्रेंडदेखील उपस्थित होते.
अक्षराने फोटोसोबत कॅप्शन लिहिलं आहे की, 'छान संध्याकाळ ख्रिसमस सेलिब्रेशन. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल माँ गीता कपूर धन्यवाद. तुमच्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला छान बनवण्यासाठी खूप सारं प्रेम.'
अक्षरा सिंगनं शेयर केलेल्या या फोटोंवर आता तिचे चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहे. त्याचबरोबर लोकांना तिची पाश्चिमात्य शैली आवडली आहे.
याआधीही अक्षरा सिंग कोरिओग्राफर गीता कपूर यांना भेटली होती. आता त्यांची ही दुसरी भेट आहे. त्यामुळं आता ते कोणत्या तरी प्रोजेक्टवर काम करत असल्याचा शंका व्यक्त केल्या जात आहे.
याशिवाय अक्षरा सिंहनं 'विवाह 2' या भोजपुरी चित्रपटात काम केलेलं होतं. त्याचबरोबर तिनं पाणी पाणी या गाण्यातही सहभाग घेतलेला होता.