जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Nysa Devgan:नशेत आहे अजय-काजोलची लेक? 20 वर्षीय न्यासाच्या लंडनमधील फोटोवरुन चर्चेला उधाण

Nysa Devgan:नशेत आहे अजय-काजोलची लेक? 20 वर्षीय न्यासाच्या लंडनमधील फोटोवरुन चर्चेला उधाण

अजय-काजोलची मुलगी न्यासाची लंडन ट्रिप

अजय-काजोलची मुलगी न्यासाची लंडन ट्रिप

Ajay Devgan-Kajol Daughter: शाहरुख आणि सैफच नव्हे तर अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासादेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 मे- बॉलिवूड सुपरस्टार्सबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दुसरीकडे त्यांची मुलेही तितकीच लोकप्रिय होत असतात. सोशल मीडियावर सुपरस्टार आणि त्यांच्या मुलांची कोणतीही पोस्ट समोर आली की, चाहते विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ लागतात. सैफ अली खानपासून ते शाहरुख खानपर्यंत, त्यांचे चाहते त्यांच्या मुलांच्या प्रत्येक पोस्टवर प्रचंड प्रेम करतात. शाहरुख आणि सैफच नव्हे तर अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासादेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. दरम्यान आता न्यासा आपल्या काही व्हायरल फोटोंमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. सध्या न्यासा देवगन आपलं व्हेकेशन एन्जॉय करत आहे. न्यासा व्हेकेशनसाठी लंडनला गेली आहे. ती तिथून अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. दरम्यान, न्यासाचा खास मित्र ओरहान अवत्रामणी अर्थातच ऑरीने तिच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. त्याचवेळी हे फोटो पाहून नेटकरी मात्र काजोल आणि अजयच्या लेकीवर टीका करत आहेत. (हे वाचा: Smriti Mandhana: प्रसिद्ध गायिकेच्या भावाला डेट करतेय स्मृती मंधाना? थेट फोटो शेअर करत म्हणाली… ) ऑरीने आपल्या इंस्टाग्रामवर न्यासासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये दोघांचा फारच बिनधास्त दिसत आहे. एका फोटोमध्ये न्यासा कारमध्ये बसली असून तिने स्टायलिस्ट काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.तर दुसऱ्या फोटोमध्ये न्यासा आणि ऑरी एकत्र पोज देत आहेत. ऑरीने आपल्या इंस्टाग्रामवर न्यासासोबत पार्टी करतानाचे फोटोही शेअर केले आहेत. न्यासाने पार्टीदरम्यान सिमरी गोल्डन टॉप घातला आहे. सांगायचं तर न्यासा जास्तीत जास्त व्हेकेशन प्लॅन्स ऑरीसोबतच करत आहेत.

News18

ऑरी आणि न्यासाच्या फोटोवर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी फोटो चांगले असल्याचं म्हटलंय तर काहींनी त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले आहेत. दरम्यान काही नेटकऱ्यांनी असंही लिहलंय की, ‘हे लोक दारुच्या नशेत राहण्याला मजामस्ती म्हणतात’. या कमेंटनंतर इतर अनेक नेटकऱ्यांनीही काजोल आणि अजयची मुलगी न्यासा नशेत असल्याची चर्चा सुरु केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

न्यासा बर्‍याचदा पार्टी करताना दिसत असते. तर अजय देवगण आपल्या मुलांबद्दल नेहमीच काळजीत असतो. नुकतंच अजय देवगणने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, लोक अनेकदा माझ्या मुलांवर लक्ष ठेवतात आणि यामुळे मला त्रास होतो. मी मुलांचं आयुष्य बदलू शकत नाही आणि ऑनलाइन ट्रोल करणाऱ्यांनादेखील थांबवू शकत नाही. अनेकवेळा चाहते सोशल मीडियावर असे काही लिहितात जे खरे नसते, यावर त्याने चिंता व्यक्त केली होती. अजयने सांगितलं होतं की, तो यावर कोणतंही उत्तर देत नाही कारण त्यामुळे प्रकरण वाढू शकतं. २० वर्षांची न्यासा सध्या स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात