शूट संपलं की इरफानला खावी वाटायची पाणी पुरी, मुलानं शेअर केला थ्रोबॅक UNSEEN VIDEO

शूट संपलं की इरफानला खावी वाटायची पाणी पुरी, मुलानं शेअर केला थ्रोबॅक UNSEEN VIDEO

इरफानचा मुलगा बाबिलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 मे : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला एक वेगळंच दुःख दिलं आहे. मात्र 2020 मधला एप्रिल महिना भारतीय विसरु शकणार नाही. कारण या महिन्याच्या अखेरीला बॉलिवूडनं दोन महान कलाकार गमावले. अभिनेता इरफान खानचं 29 एप्रिलला निधन झालं. इरफाननं वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर त्याच्या आठवणीत जागवणारे त्याचे अनेक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतानाच त्याचा मुलगा बाबिलनं वडिलांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

इरफान खानच्या निधनानंतर त्याची पत्नी आणि दोन्ही मुलं त्याला खूप मिस करत आहेत. अशात इरफानचा मुलगा बाबिलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात इरफान एका हॉटेलमध्ये बसून आरामात पाणीपुरी खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना बाबिलनं लिहिलं, जेव्हा तुम्ही बराच काळ डाएटवर असता आणि मग शूटिंग संपतं त्यानंतर तुम्ही पाणी पुरी खाऊ शकता. इरफानचा हा व्हिडीओ पाहिल्यावर त्याचे चाहते सुद्धा भावुक झाले आहेत.

दरम्यान इरफानच्या निधनानंतर त्याची पत्नी सुतापानं त्यांच्या संपूर्ण फॅमिलीकडून एक पत्र प्रसिद्ध केलं होतं. ज्यात तिनं हा संपूर्ण काळ त्यांच्या लाइफमधला कठिण काळ असला तरीही आम्ही काही गमावलं नाही तर इरफाननं आम्हाला बरंच काही दिलं आहे असं म्हटलं होतं. तसेच त्याला शेवटच्या क्षण तुम्ही ठेवलंत त्या ठिकाणी आम्ही त्याच्या आवडत्या रातराणीचं झाड लावणार असल्याचं तिनं या पत्रात म्हटलं होतं.

First published: May 2, 2020, 1:18 PM IST

ताज्या बातम्या