मुंबई, 23 जुलै : मराठी सिनेसृष्टीतील चिरतरुण आणि लोकप्रिय जोडपं म्हणजे अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री नारकर. या दोघांचा फिटनेस आणि एनर्जी तरुणांना लाजवेल अशीच आहे. अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या वयात फार फरक आहे. मात्र तरीही तारूण्याच्या बाबतीत दोघेही एकमेकांचा टक्कर देताना दिसतात. अभिनयासोबतच दोघेही त्यांच्या भन्नाट रिल्समुळं चर्चेत असतात. अविनाश यांची रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतंच एका ट्रेंडिंग गाण्यावर दोघांनी केलेला रील चर्चेत आलं आहे. अविनाश आणि ऐश्वर्या नारकर हे जोडपं सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. ऐश्वर्या नारकर यांचं या वयातील सौंदर्य आणि अविनाश नारकर यांचा फिटनेसवर चाहते भाळतात. नुकतंच दोघांनी एकत्रपणे एका ट्रेंडिंग गाण्यावर केलेलं रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अविनाश आणि ऐश्वर्या यांनी रजनीकांत आणि तमन्ना भाटिया यांचं ट्रेंडिंग गाणं कवाले’ याच्यावर डान्स केला आहे. दोघांचा डान्स चाहत्यानाच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओतील दोघांची एनर्जी पाहून चाहते थक्क झाले आहेत. ऐश्वर्या यांनी हा व्हिडीओ शेअर करत ‘त्यांची एनर्जी मॅच करण्याचा प्रयत्न करत आहे’ असं म्हटलं आहे. दोघांच्याही व्हिडिओवर चाहते कमेंट्स करत आहेत. दीड वर्षात 3 चित्रपट फ्लॉप, ‘या’ सुपरस्टारमुळं निर्मात्यांचं 410 कोटींचं नुकसान; आता एका सिनेमावर टिकलंय भविष्य ‘यशस्वी जोडी आहात बिनधास्त फायर हैंखूप दिवसांपासूनची अपेक्षा होती…’, ‘आज पूर्ण केली..दोघडणी एकत्र येऊन डान्स केलात…’, ‘लई भारी वाटलं’, ‘आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही लाजवत आहात…’, ‘अविनाश साहेब आणि ऐश्वर्यामॅडम, काय सुंदर नृत्य करता हो! अफलातून! अविनाश साहेबांची एनर्जी लाजवाब!’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ऐश्वर्या सध्या झी मराठीवरील, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेतील त्यांची खलनायिकेच्या भूमिकेला सुद्धा चाहत्यांची पसंती मिळत आहे. तर अविनाश नारकर नुकतेच फकाट या चित्रपटात दिसले होते. ऐश्वर्या आणि अविनाश यांची लव्हस्टोरी खूपच युनिक आहे. या दोघांची भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. ऐश्वर्याला पाहताक्षणीच अविनाश तिच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांनी ऐश्वर्यासमोर प्रेमाची कबुली दिली. ऐश्वर्याच्या होकारानंतर त्यांनी त्यांच्या घरी जात आईवडिलांसमोर लग्नाची मागणी घातली होती. 3 डिसेंबर 1995 रोजी ऐश्वर्या आणि अविनाश यांच लग्न पार पडलं. ऐश्वर्या यांचं लग्नाआधीचं नाव पल्लवी आठल्ये असं होतं. लग्नानंतर त्या ऐश्वर्या नारकर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.