मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धार्थच्या जाण्याने असिमला सावरणं कठीण; गर्लफ्रेंड हिमांशीने सांगितली अवस्था

सिद्धार्थच्या जाण्याने असिमला सावरणं कठीण; गर्लफ्रेंड हिमांशीने सांगितली अवस्था

अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थचं असं निघून जाणं सर्वांच्याचं मनाला चटका लावणारं होतं.

अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थचं असं निघून जाणं सर्वांच्याचं मनाला चटका लावणारं होतं.

अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थचं असं निघून जाणं सर्वांच्याचं मनाला चटका लावणारं होतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 सप्टेंबर-  ‘बिग बॉस 13’(Bigg Boss 13) विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृत्यूने सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. या गोष्टीवर अजूनही लोकांचा विश्वास बसत नाहीय. सोशल मीडियावर सर्वत्र सिडच्याच चर्चा सुरु आहेत. चाहते त्याच्या आठवणीत बुडाले आहेत. तर दुसरीकडे त्याची आई, गर्लफ्रेंड शेहनाज गिल, मित्र अजूनही या धक्क्यातून सावरले नाहीत.तसेच बिग बॉस 13चा उपविजेता असिम रियाज (Asim Riyaz) याला अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे, की सिद्धार्थ आपल्याला सोडून गेलाय. हे दोघेही चांगले मित्र होते. इतकचं नव्हे तर सिद्धार्थ त्याला आपला लहान भाऊ मानत होता. त्याचीसुद्धा सध्या वाईट अवस्था आहे. त्याची गर्लफ्रेंड हिमांशी खुरानाने(Himanshi Khurana) याबद्दलची माहिती दिली आहे.

अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थचं असं निघून जाणं सर्वांच्याचं मनाला चटका लावणारं होतं. इतरांप्रमाणे त्याचा जवळचा मित्र आणि आणि छोटा भाऊ समजला जाणारा असिम रियाझदेखील पूर्णपणे तुटून गेला आहे. त्यालासुद्धा सावरणं कठीण झालं आहे. असिम सिद्धार्थच्या आई आणि बहिणींसोबत तठस्थ रुग्णालयात आणि इतर कार्यात बसून होता. त्याने एका लहान भावासारखं आपलं कर्तव्य बजावलं आहे. मात्र त्याच्या जाण्याने असिमची वाईट अवस्था झाली आहे.

(हे वाचा: सिद्धार्थ शुक्लाला WWE चॅम्पियन John Cenaने वाहिली श्रद्धांजली  )

असिम रियाझची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री हिमांशी खुरानाने नुकताच सांगितलं आहे, ‘2 सप्टेंबरलाचं सिद्धार्थ असिमच्या स्वप्नात आला होता. सिद्धार्थ आपल्या बिग बॉसच्या प्रवासाचा व्हिडीओ पाहात होता. आणि अचानक येऊन त्याने असिमला मिठी मारली. मात्र अचानक असं काही घडल्याने असिमला मोठा धक्का बसला आहे’. हिमांशीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं अये, ‘असिम अजूनही या धक्क्यातून सावरला नाहीय. त्याची वाईट अवस्था झाली आहे. तो अजूनही हाच विचार करत आहे की सिद्धार्थ आपल्यासोबत बिग बॉसचा व्हिडीओ पाहात आहे’.

बिग बॉसमध्ये सिद्धार्थ आणि असिम खूप चांगले मित्र बनले होते. मात्र नंतर त्यांच्यात वादविवाद निर्माण झाले होते. मात्र शो संपण्यापूर्वी या दोघांनी आपल्यातील वाद मिटवून पुन्हा मैत्री केली होती.

First published:

Tags: Siddharth shukla