मुंबई, 16 फेब्रुवारी : बॉलिवूडचा हॅंडसम हंक अभिनेता कार्तिक आर्यन सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत चाललेली पहायला मिळत आहे. चाहत्यांमध्ये अभिनेत्याची खूप क्रेझ आहे. त्याचा ‘शेहजादा’ चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. लवकरच तो प्रदर्शित होणार असून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच नुकतंच कार्तिकच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळालं आहे. कार्तिक आर्यनचा बहुचर्चित ‘शेहजादा’ चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच चित्रपटातील गाणी देखील हिट होत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे ‘कॅरेक्टर धीला 2.0’ हे गाणे रिलीज झाले आहे. अलीकडेच दिल्लीच्या इंडिया गेटवर ‘शेहजादा’च्या टायटल ट्रॅकचे लाँचिंग करण्यात आले. आता कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाचा ट्रेलर आता थेट जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर झळकला आहे. हेही वाचा - Bhumi Pednekar : सगळ्यांसमोरच भूमीने बॉयफ्रेंडला केलं किस; ‘तो’ मिस्ट्री मॅन नक्की आहे तरी कोण? नुकताच बुर्ज खलिफावर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि आता कार्तिक आर्यनची पाळी आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडली नाहीये. सध्या सगळीकडेच कार्तिक आणि क्रिती या सिनेमाचं जोरदार प्रमोशन ककरण्यात व्यस्त आहेत. रिलीज डेट जवळ आल्याने निर्माते प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून अलीकडेच, बॉलीवूडच्या शहजादा कार्तिकने बुर्ज खलिफाला भेट दिली आणि बुर्ज खलिफावरील चित्रपटाचा प्रमोशनल टीझर दाखवला.
कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्यांना भेटून दुबई दौऱ्याची सुरुवात केली. या दौऱ्यातील मुख्य आकर्षण बुर्ज खलिफावर झळकलेला चित्रपटाचा ट्रेलर आहे. आता हे पाहून कार्तिकचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उतावळे झाले आहेत. हा चित्रपट उद्या म्हणजेच 17 फेब्रुवारीला रिलीज होणार असून प्रेक्षक चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे.
‘शेहजादा’ रोहित धवन दिग्दर्शित असून, कार्तिक आर्यन, क्रिती सॅनन, मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर यांच्या भूमिका आहेत आणि प्रीतमचे संगीत, भूषण कुमार, अल्लू अरविंद, अमन गिल यांनी संगीत दिले आहे आणि कार्तिक आर्यन निर्मित आहे. या शुक्रवारी, 17 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.