जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / टोनी कक्करच्या 'Booty Shake' या नव्या गाण्यावर हंसिका मोटवानीचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

टोनी कक्करच्या 'Booty Shake' या नव्या गाण्यावर हंसिका मोटवानीचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

टोनी कक्करच्या 'Booty Shake' या नव्या गाण्यावर हंसिका मोटवानीचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

हंसिका मोटवानीच्या (Hansika Motwani) एका अल्बम गाण्याने (Album song) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी: बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणारी हंसिका मोटवानी (Hansika Motwani) आता बॉलिवूड (Bollywood) आणि साउथ चित्रपटसृष्टीतील (South Films) एक नामांकित अभिनेत्री झाली आहे. सध्या तिच्या एका अल्बम गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी ती टोनी कक्करच्या (Tony Kakkar) ‘बूटी शेक’ (Booty Shake) या नवीन गाण्यात धमाल करताना दिसली आहे. या गाण्याचा व्हिडिओ (Video) प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या गाण्याची सर्वात खास बाब म्हणजे हंसिकाची अदा. टोनीच्या या गाण्यात हंसिकाचं एक वेगळंच ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळालं आहे. हे गाणं सोशल मीडियावर खूपच पसंत केलं जात आहे. इतकेच नाही तर या गाण्याच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सतत प्रतिक्रिया देऊन लोकं हंसिकाच्या सौंदर्याचे कौतुकही करीत आहेत. ‘देसी म्युझिक फॅक्टरी’ने 24 तासांपूर्वी प्रदर्शित केलेल्या या गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यंत 37 लाखाहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाख 81 हजार जणांनी लाईक केलं आहे.

हे गाणं स्वतः टोनी कक्करने लिहिलं आहे, आणि संगीतबद्धही केलं आहे. टोनी कक्कर हा प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा भाऊ आहे. टोनीचं हे गाणं प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर वेगात व्हायरल झालं आहे. यामागचं कारण त्याचे सोशल मीडियावर असलेले असंख्य चाहते. इन्स्टाग्रामवर टोनीला 60 लाखाहून अधिक लोकं फॉलो करतात. खरंतर टोनीचे गाणे युवकांमध्ये सर्वात जास्त पाहिले आणि ऐकले जातात. त्याची तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे. त्यामुळे चाहते टोनीच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात