
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिजनेसमॅन राज कुंद्राला सोमवारी मुंबई क्राइम ब्रँचने अटक केली. अश्लिल चित्रफित प्रकरणी ही अटक करण्यात आली होती.

शिल्पा शेट्टी सुपर डान्सर्स या रियॅलिटी शोची जज आहे. पण पती राज कुंद्राच्या अटकेची बातमी समजताच शिल्पाने हे शुटींग अर्धवट सोडलं आहे.

अश्लिल चित्रफिती आणि विविध साइट्सवर त्याचं अपलोडींग या प्रकरणात राज कुंद्रावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २३ जुलै पर्यंत राजला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.अश्लिल चित्रफिती आणि विविध साइट्सवर त्याचं अपलोडींग या प्रकरणात राज कुंद्रावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २३ जुलै पर्यंत राजला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान शिल्पाही सुपर डान्सरची जज आहे. मात्र पतीच्या अटकेनंतर तिने पुढील शुटींग रद्द केलं आहे. मंगळवारी होणाऱ्या शुटींगला ती हजर राहीली नाही.

मुंबईतील फिल्मसिटीत सुपर डान्सर शोचं शुटींग सुरू आहे. तर आजच्या एपिसोडच्या शुटींगमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरही हजर राहाणार होती. मात्र शिल्पाने ऐनवेळी येण्यास नकार दिला.

अश्लिल चित्रफिती प्रकरणी फेब्रुवारी महिन्यातच राजवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता पोलिसांच्या हाती सबळ पुरावे लागले आहेत. त्यामुळे लगेचच राज कुंद्रा ला अटक करण्यात आली.




