मुंबई 24 मे**:** ‘अग्गबाई सूनबाई’ (Agabai Sunbai) ही मालिका गेल्या काही काळात सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. या मालिकेतील संकल्पनेवर वारंवार प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त करत आहेत. यातच आता आणखी एका दृश्यामुळं प्रेक्षकांची नाराजी वाढली आहे. मालिकेत सोहमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अद्वैत दादरकरनं (Adwait Dadarkar) शिलाई मशीनला लाथ मारली होती. हे दृश्य पाहून प्रेक्षक संतापले होते. मात्र अखेर वाढत्या टीकेमुळं अद्वैतनं सर्वांची माफी मागितली आहे. ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेमध्ये शुभ्रा ही स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असते. त्याचा एक भाग म्हणून ती मशीनवर बसून कपडे शिवताना दाखवली आहे. त्याचवेळी तिचा नवरा सोहम तिथे येतो आणि तिला वाट्टेल तसे बोलत तिचा अपमान करतो. तिच्या आत्मसन्मानाला दुखवण्यासाठी सोहम तिच्या शिलाई मशीनची मोडतोड करतो आणि त्याला लाथ मारतो. ‘त्या दिवशी हृतिकमुळं मी मरणारच होतो’; अभय देओलनं सांगितला जीवघेण्या अपघाताचा थरारक अनुभव
हे दृश्य पाहून प्रेक्षक संतापले अन् त्यांनी झी वाहिनीला पत्र आणि इमेल पाठवून आपली नाराजी व्यक्त केली. देशभरातील अनेक लोकांसाठी शिलाई मशीन हे त्यांच्या उपजीवीकेचं साधन आहे. ते या मशीनची अगदी देवाप्रमाणे पूजा करतात अन् मालिकेत मात्र या अन्नदेवतेचा अपमान केला जातोय. परिणामी या मालिकेवर बंदी घाला अशी मागणी जोर धरु लागली होती. अखेर अद्वैतनं या प्रकरणी सर्व प्रेक्षकांची माफी मागितली. झी वाहिनीनं देखील या दृश्याची गांभीर्यानं नोंद घेतली. त्यांनी वाढता विरोध पाहून लगेचच ती व्हिडीओ क्लिप डिलिट केली. शिवाय प्रसारित झालेल्या भागातूनही ते दृश्य एडिट करण्यात आलं. शिवाय यापुढे असे दृश्य पुन्हा दाखवली जाणार नाही असं आश्वासन अव्दैतनं संपूर्ण मालिकेतर्फे प्रेक्षकांना दिलं आहे.

)







