Home /News /entertainment /

CID मधील अभिजित कोरोनामुळं बेरोजगार; निर्मात्यांकडे मागतोय काम

CID मधील अभिजित कोरोनामुळं बेरोजगार; निर्मात्यांकडे मागतोय काम

संकटाचा सामना सध्या प्रसिद्ध अभिनेता आदित्य श्रीवास्तव देखील करत आहे. CID या मालिकेतून घराघरात पोहोचलेला आदित्य बेरोजगार असून आर्थिक संकटांशी दोन हात करत आहे.

    मुंबई 8 मे: कोरोनाचं (coronavirus) संकट थांबण्याचं नावच घेत नाहीये. कोरोनाच्या या वाढत्या संक्रमणाचा फटका सर्वसामान्य लोकांसोबतच आता सेलिब्रिटींनाही बसू लागला आहे. चित्रपट मालिकांचं शूटिंग बंद असल्यामुळं कलाकार देखील बेरोजगार झाले आहेत. शिवाय कोट्यवधींचं नुकसान झाल्यामुळं निर्मात्यांनी देखील आधीच्या कामाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळं कलाकारांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. अन् अशाच काहीशा संकटाचा सामना सध्या प्रसिद्ध अभिनेता आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) देखील करत आहे. CID या मालिकेतून घराघरात पोहोचलेला आदित्य बेरोजगार असून आर्थिक संकटांशी दोन हात करत आहे. फ्री प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आदित्यनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं कोरोना काळातील बेरोजगारीचाही अनुभव सांगितला. तो म्हणाला, “इतरांप्रमाणे मी देखील घरात बसलो होतो. सर्वत्र शूटिंग बंद असल्यामुळं काम देखील मिळत नव्हतं. अन् बेरोजगारीमुळं आर्थिक संकट माझ्यावरही कोसळलं होतं. शिवाय आधी केलेल्या कामाचे पैसे देखील पुर्ण मिळाले नव्हते. त्यामुळं माझ्यावरही नैराश्येत जाण्याची पाळी आली होती. आम्ही कलाकार कोट्यवधी रुपये बाळगून असतो हा सर्वसामान्य लोकांचा गैरसमज आहे. आमचं पोट देखील सामान्य मजुरांप्रमाणेच रोजंदारीवर चालतं. फरक फक्त इतकाच की रुपेरी पडद्यावर झळकताना आम्ही चकाचक दिसतो. परंतु लोक हे विसरतात की ते कपडे हे भाड्याचे असतात आमचे स्वत:चे नाही. परंतु ही वेळ देखील निघून जाईल. सरकार, प्रशासन, आरोग्य व्यवस्था जीव ओतून काम करतेय. इतके महिने आपण कळ सोसली थोडी आणखी सोसूया. लवकरच कोरोनावर लस येईल अन् परिस्थिती पूर्ववत होईल.” असा विश्वास त्यानं या मुलाखतीत व्यक्त केला. ‘अरे ही तर संतुरवाली मम्मी’; दिपालीच्या ट्रेडिशनल लूकवर होतोय कौतुकाचा वर्षाव आदित्य श्रीवास्तव हा भारतीय मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिंदी, बंगाली आणि दाक्षिणात्य चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. CID या मालिकेमुळं तो खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला होता. या मालिकेत त्यानं साकारलेली इन्स्पॅक्टर अभिजित ही व्यक्तिरेखा तुफान गाजली. आजही अनेक चाहते त्याला त्याच्या खऱ्या नावाऐवजी अभिजित या नावामुळंच अधिक ओळखतात. येत्या काळात तो ह्युमन या वेब सीरिजच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Corona hotspot, Tv actor

    पुढील बातम्या