एकीकडे ऐश्वर्या आणि दीपिकाच्या हटके लूक्सची चर्चा असताना अदितीने मात्र सिम्पल तरीही एलिगंट लुकसोबत जाणं पसंत केलंय.
यात तिने काळ्या रंगाचा लॅव्हिश गाऊन, डोक्याला गुलाबट रंगाचा हेअर बँड, सोन्याची एलिगंट ज्वेलरी, कपाळावर टिकली असा लूक करत सगळ्यांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे.
तिचा हा लूक आत्तापर्यंतच्या सगळ्या अभिनेत्रींच्या लूक्स पेक्षा खूप नॅचरल आणि ग्रेसफुल आहे असं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे.
कान्स फेस्टिव्हलला हजेरी लावणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये बॉलिवूड मस्तानी दीपिका पदुकोणचं नावसुद्धा घेतलं पाहिजे.
कान्स फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोण सहभागी होणार हे समजल्यापासूनच सर्वांचं लक्ष तिच्याकडे लागलं होतं.
कान्सच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री कोणत्या अवतारात दिसणार? तिचा लुक कसा असणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.
दीपिकाने सगळ्या वेस्टर्न लूक्सला छेद देत साडी नेसून वेस्टर्न ज्वेलरी परिधान करून इंडो- वेस्टर्न साडी लुक तयार केला होता.
एकीकडे अदितीच्या लुकवर फॅन्सनी कौतुकाचा वर्षाव केला तर दुसरीकडे दीपिका काही प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.