मुंबई, 23 ऑक्टोबर- साऊथ सुपरस्टार प्रभासची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. त्याला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. लवकरच अभिनेता 'आदिपुरुष' या बहुचर्चित चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील प्रभासचा फर्स्ट लुक समोर आला होता. दरम्यान आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त प्रभासचा 'आदिपुरुष' चित्रपटातील नवा लूक समोर आला आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. परंतु या ट्रेलरवरुन सोशल मीडियावर प्रचंड वाद निर्माण झाला होता. या चित्रपटातील सैफ अली खानचा लुक वादात अडकला होता. दरम्यान आता अभिनेत्याचा दुसरा लुक चर्चेत आला आहे.
साऊथ अभिनेता प्रभास नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या बिग बजेट चित्रपटांची चाहत्यांना नेहमीच प्रतीक्षा असते. बाहुबलीनंतर हा अभिनेता जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्यामुळेच जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे. विदेशातसुद्धा त्याची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. अभिनेत्याला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. प्रभास लवकरच मराठमोळे दिग्दर्शक ओम राउत यांच्या 'आदिपुरुष' या बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याचा प्रभू श्रीरामाच्या अवतारातील फर्स्ट लुक समोर आला होता. हा लुक त्याच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडला होता.
(हे वाचा:Prabhas B'day: आलिशान घर, कोट्यावधींचं कार कलेक्शन; तुम्हाला माहितेय का प्रभासची एकूण संपत्ती? )
प्रभासला प्रभू श्रीरामच्या भूमिकेत पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. प्रभासचा फर्स्ट लुक त्याच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडला होता. त्यानंतर चाहत्यांना चित्रपटाच्या दुसऱ्या पोस्टरची प्रतीक्षा लागून होती. यासाठी निर्मात्यांनी प्रभासच्या वाढदिवसाचा दिवस निवडला आहे. प्रभाससोबतच त्याच्या चाहत्यांसाठी हे एक मोठं सरप्राईज आहे. प्रभासने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटातील दुसरा लुक शेअर केला आहे.
View this post on Instagram
या दुसऱ्या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामच्या अवतारात हातात धनुष्यबाण घेऊन युद्धभूमीवर उभे असलेले दिसून येत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज दिसून येत आहे. त्यांच्या मागे वानरसेना उभी आहे. ते आताच रावणाचा वध करणार असल्यासारखं भासत आहे. या फोटोला कॅप्शन देत 'मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम' असं लिहण्यात आलं आहे. प्रभासला प्रभू श्रीरामच्या अवतारात पाहून त्याचे चाहते फारच आनंदी झाले आहेत.
असा आहे फर्स्ट लुक-
अभिनेता प्रभासने काही दिवसांपूर्वी आपल्या इस्टाग्राम अकाउंटवर आपल्या चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये प्रभास हातात धनुष्य बाण घेऊन गुडघ्यावर बसला आहे. त्याने आकाशाकडे बघत आपला धनुष्यबाण ताणून धरला आहे. अभिनेत्याचा हा फर्स्ट लुक प्रभू श्री रामाच्या योद्धा अवतारातील आहे. हा पोस्टर समोर येताच प्रभासचे चाहते प्रचंड आनंदी झाले होते. बहुचर्चित 'आदिपुरुष' हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Prabhas