अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतच एक फोटोशुट केलं आहे. ज्यात तिला ओळखणही कठीण झालं आहे. तिचे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. पाहा तिचे फोटो. छोट्या पडद्याची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तेजश्री तिच्या लुक्ससाठीही तितकीच प्रसिद्ध आहे. बेबी पिंक ड्रेसमध्ये नुकतच तिने एक शुट केलं आहे. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अग्गबाई सासूबाई या मालिकेत तेजश्री काही महिन्यांपूर्वी दिसली होती. तेजश्रीच्या या नव्या लुकवर तिला तुफान प्रतिक्रिया येत आहेत. अग्गबाई सासूबाईनंतर ती कोणत्याही मालिकेत अद्याव दिसली नाही. दरम्यान तेजश्री २०२०ची टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन ठरली होती. मालिकेंसोबतच तेजश्रीने काही चित्रपटांतही काम केलं आहे. मराठी सिनेविश्वात तेजश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही तेजश्रीची मोठी फॅनफॉलोइंग आहे.