बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी चित्रपट 'हसीन दिलरुबा' साठी चर्चेत आहे. तापसी सध्या रशियाला गेली आहे. तापसीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
तापसी रशियात धम्माल करताना दिसत आहे. तापसीने साडीसह शूज घातले आहेत, ज्यामुळे तिच्या स्वॅगमध्ये आणखी भर पडली आहे.
सेंट पीटर्सबर्गच्या कॉफी शॉपमध्ये कॉफी पीत असताना तिने हा फोटो शेयर केला होता. हा फोटो शेयर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले 'द कॉफी टपरी.'
तापसी ही एक अशी अभिनेत्री आहे जिने अभिनयात कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही. तरीही तिने आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले आहे.
तापसीचा आगामी चित्रपट 'हसीन दिलरुबा' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.