मुंबई 12 जून : बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी श्रुती हसन (Shruti Hassan) सध्या वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. तर तिचं दुःख ती कवितांच्या स्वरुपातही मांडत असते. काहीच दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीत ती आर्थिक विवंचनेत असल्याचं म्हटलं होतं. तर वेळोवेळी ती तिच्या भावना मांडत असते. काही दिवसांपूर्वी श्रुतीने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. तेव्हा सद्या लॉकडाउनमुळे तिच्याकडे काहीच पैसे उरले नसल्याचं ती म्हणाली होती. तसेच इएमआयचेही पैसे नाहीत असही ती म्हटली होती. शिवाय तिने म्हटलं आहे की तिला वडिल कमल हसन (Kamal Hassan) यांच्याकडून कोणतीही मदत मिळत नाही. काही वर्षांपूर्वीच तिने तिच्या बाबांच घर सोडलं आहे असही तिने सांगितलं.
पुढे ती असही म्हणाली की, सध्या ती कोणतही गाणं किंवा कविता लिहू शकत नाही पण कवितेतून विचार मांडल्यानंतर दुःख हलक होतं असही ती म्हणाली होती. ती नेहमीच आपल्या विचारांना दुजोरा देण्यासाठी लिहिण्याचा सहारा घेते. ती पुढे म्हणाली की, “क्रियेटीव्हीटी साठी ही खूप आव्हानात्मक वेळ आहे आणि मी काहीच लिहू शकत नाही. मला सुचत नाही की मी काय लिहू , जेव्हा मी लिहिते तेव्हा ते वेगळं असतं, मी जे पाहते, अनुभवते ते माझ्या कवितांमधून झळकतं.”
चाळीतला मुलगा पडला श्रीमंत मॉडेलच्या प्रेमात; अशी होती जॅकी-आयशाची लव्हस्टोरीमागील अनेक काळापासून श्रुती वेळोवेळी तिचं मन मोकळं करताना दिसत आहे. तर ती तिच्या आई -बाबांच्या घटस्फोटावरही म्हणाली होती. व जे झालं ते चांगलचं झालं असही ती म्हणाली होती. ती म्हणाली, “मी उत्साही होते की दोन माणसं आता त्याचं आयुष्य जगणार आहेत. मी खूश होते कारण मी समजू शकत नव्हते की जर दोन लोकांना एकत्र राहायचं नाही तर ते एका एकत्र आहेत. ते वेगळे झाल्यानंतरही ते चांगले पालक आहेत. मी बाबांच्या खूप जवळ आहे.”