मुंबई 30 मे : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदेने (Shilpa Shinde) म्हणजेच लोकप्रिय शो ‘भाभीजी घर पर है’ मधील पूर्वीची अंगूरी भाभी (Anguri Bhabhi). तसेच बिग बॉस 11 (Big boss) विनर शिल्पाने आता अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अस एंकदरीतच एका व्हिडीओ वरून समोर येत आहे. शिल्पाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर एका बांधकाम साईट वरील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती हातात मशीन घेऊन भिंतीचं बांधकाम तोडताना दिसत आहे. याशिवाय तिने याला एक कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शन मध्ये ती म्हणते, ‘लॉकडाउन झाला तर आता बांधकाम क्षेत्रात आले. ज्यांच्याकडे अजूनही काम नाही ते आपलं क्षेत्र बदलू शकतात. वेळेसोबत सगळं काही ठिक होईन, फक्त सकारात्मक राहा.’
View this post on Instagram
त्यामुळे आता शिल्पाने अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम केला का? असाही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. अनेकजन तिचं हे नवं रुप पाहून हैरान झाले आहेत. तर तिला अनेक कमेंटसही मिळाल्या आहेत. अनेकांनी तिच्या हिमतीची दाद दिली आहे. तर काहींनी तिला ‘सुपरवुमन’ म्हटलं आहे.
'मी शाकाहारी आहे, आणि माझ्या नावाने मटण शॉप?' 'तो' Video पाहून सोनूही चाट पडला
लॉकडाउन नंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांची कामं बंद पडली. तसेच व्यवसायही ठप्प झाले. याशिवाय कला, अभिनय क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेकजन बेरोजगार झाले आहेत. अशातच शिल्पाने उचललेलं हे पाऊल अनेकांना धाडसी वाटत आहे. शिल्पाला ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून मोठी ओळख मिळाली होती. या आधीही तिने अनेक मालितकांत लहानमोठी पात्र साकारली होती. नुकतीच ती ‘पोरषपुर’ या वेबमालिकेतही दिसली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Shilpa shinde