अभिनेत्री सूत्रसंचालक म्हणून ओळख असलेली मराठमोळी अभिनेत्री समीर गुजर हिला राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांसमोर काम करण्याची संधी मिळाली.
नुकतचं मुंबईतील राजभवनातील 'क्रांतिकारक गॅलरीचं' उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.
समीरानं नेहमीप्रमाणाचे तिच्या उत्तम शैलीनं उत्तम सूत्रसंचालन करत कार्यक्रम पार पाडला. तिच्या या सूत्रसंचनलाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कौतुक केलं.
समीराच्या आजवरच्या कारकिर्दीतील हा सोनेरी क्षण होता. याविषयी सविस्तर पोस्ट लिहीत तिनं सर्वांचे आभार मानले.
समीरानं या कार्यक्रमासाठी खास मराठमोळा लुक केला होता. त्याचे काही खास फोटो तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.
समीरा गुजर हा दूरदर्शनवरील सर्वांच्या ओळखीचा चेहरा आहे. निवेदन तसेच अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकलीत.
अभिनेत्रीचं मराठी आणि संस्कृत विषयावर विशेष प्रभुत्व आहे. समीरानं संस्कृत विषयात बी.ए आणि एम.ए केलं आहे. त्याचप्रमाणे समीरानं मराठी विषयातही एम. ए केलं आहे. मुंबईच्या रुईया महाविद्यालयात ती लेक्चरर म्हणूनही काम करते.
अनेक मराठी मालिकांमधून समीरानं काम केलं आहे. गाढवाचं लग्न या सिनेमात तिनं साकारलेली राजकुमारीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. समीराचा नुकताच 'आय एम सॉरी' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत असलेल्या रानबाजार या वेब सीरिजमध्येही समीरानं चारुदत्त मोकाशीच्या बायकोची भूमिका साकारली आहे.