जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी बॉईज टॉयलेटमध्ये......'; 'बस बाई बस'च्या मंचावर हे काय बोलून गेली Sai Tamhankar

'मी बॉईज टॉयलेटमध्ये......'; 'बस बाई बस'च्या मंचावर हे काय बोलून गेली Sai Tamhankar

'मी बॉईज टॉयलेटमध्ये......'; 'बस बाई बस'च्या मंचावर हे काय बोलून गेली Sai Tamhankar

मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईनं वैविध्यपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 सप्टेंबर: मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईनं वैविध्यपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. सई सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशीही नेहमीच कनेक्टेड असलेली पहायला मिळते. अशातच सईनं झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बस बाई बस’ मध्ये हजेरी लावली. याचा व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. ‘बस बाई बस’ च्या आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सई ताम्हणकर पुढच्या भागाची पाहुणी असल्याचं दिसतंय. समोर आलेल्या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की, सुबोध भावे सईला काही प्रश्न विचारत आहेत. सईला गणितासंर्भातीलही प्रश्न विचारल्यावर ती गोंधळून गेल्याची दिसत आहे. त्यामुळे सईचा आणि गणिताचा छत्तीसचा आकडा असल्याचं दिसतंय. यावेळी सुबोध भावे सईला बॉईस होस्टेला कधी गेली आहेस का? विचारतात यावर सई म्हणते ‘बॉईज होस्टेलला नाही गेले मात्र बॉईज टॉयलेटमध्ये गेले आहे’.

जाहिरात

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘बस बाई बस’ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या पहायला मिळतात. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सुबोध भावे निरनिराळे प्रश्न विचारतात. हेही वाचा -  Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी 4 बद्दल महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले, मी…. दरम्यान, आगामी भागाच्या या प्रोमाने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं असून प्रेक्षकांची उत्सुकताही वाढवली आहे. त्यामुळे सईसोबत सुबोध भावे काय गप्पा मारणार आणि कोणते प्रश्न विचारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात